Twitter CEO पदावरून Elon Musk चा राजीनामा? 'या' महिलेच्या हाती जाणार सूत्र

Twitter CEO News : नुकताच ट्विटरचा ताबा घेतलेले एलॉन मस्क यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात एलॉन मस्क ट्विटर पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 12, 2023, 10:53 AM IST
Twitter CEO पदावरून Elon Musk चा राजीनामा? 'या' महिलेच्या हाती जाणार सूत्र   title=
Elon Musk announce twitter new ceo is woman

Elon Musk News in Marathi : ट्विटर स्वतः एक सोशल मीडिया साइट आहे. त्याचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk Twitter CEO) आहेत. गेल्या वर्षी एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. यापुढेही अनेक बदल होण्याची शक्यता आहे. मग कर्मचाऱ्यांची कपातीच निर्णय असो, किंवा ब्लू टिक (Blue Tick) काढण्याचा निर्णय असो. असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा ट्विटरसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लवकरच एलॉन मस्क यांचा लवकरच सीईओ पदावरुन पायउतारा घेणार आहेत. नेमकं यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया...

अब्जाधीश एलॉन मस्क यांनी गुरुवारी (11 मे 2023) ट्विट करून ते ट्विटरचे सीईओ पद सोडत असल्याचे जाहीर केले. आणि या पदावर नवीन सीईओची निवड होणार असल्याचे देखील स्पष्ट केले. त्यांनी नवीन सीईओचे नाव जाहीर केले नाही. मात्र नवीन सीईओ एक महिला असेल, असे संकेत मस्क यांनी दिले आहेत. 

वाचा : कच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण

याबाबत एलॉन मस्क (Elon Musk) यांनी गुरुवारी ट्विट करताच ही घोषणा केली. ‘मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की, मी नव्या सीईओची निवड केली आहे. ती व्यक्ती सहा आठवड्यांच्या आत जबाबदारी सांभाळली. मी सीईओ पदाचा राजीनामा देईन आणि ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य प्रौद्योगिक अधिकारी म्हणून काम करेन.' त्यामुळे नवीन व्यक्तीची उत्तराधिकारी म्हणून निवड केल्यानंतरही  एलॉन मस्क ट्विटरशी संबंधित निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते यापुढे आता कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत राहतील. त्यामुळेच कंपनीचे उत्पादन आणि सॉफ्टवेअरशी संबंधित बाबींवर ते लक्ष ठेवतील. 

ट्विटरवर अनेक बदल

एलॉन मस्क यांनी ट्विटर घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. एलॉन मस्कने गेल्या महिन्याच्या अखेरीस ट्विट करून वापरकर्त्यांना सूचित केले होते की, युजर्सना प्रत्येक खात्यानुसार फी भरावी लागेल, असे त्यांनी सांगितले असते. ते म्हणाले होते की, जर वापरकर्त्याने मासिक सदस्यतासाठी साइन अप केले नाही तर त्यांना लेख वाचण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार. दर दुसरीकडे महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ट्विटरच्या वापरकर्त्यांना मिळणारी ब्लू टिक ही सशुल्क केली. त्या निर्णयाला अनेक युजर्सने विरोध केला.. मुदत संपल्यानंतर अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींची ही ब्लू टिक गायब झाली होती. मात्र अनेकांनी पैसे भरल्यानंतर ही ब्लू टिक त्यांना परत मिळाली.