Elon Musk यांनी स्वीकारला उपवास मार्ग, कुणाच्या सांगण्यावरून घेतला असा निर्णय

एलॉन मस्क जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. असं असूनही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेटकऱ्यांसमोर आपलं वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा करत असतात.

Updated: Aug 29, 2022, 04:19 PM IST
Elon Musk यांनी स्वीकारला उपवास मार्ग, कुणाच्या सांगण्यावरून घेतला असा निर्णय title=

Elon Musk Fasting: एलॉन मस्क जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. असं असूनही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेटकऱ्यांसमोर आपलं वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा करत असतात. नेटकऱ्यांनाही त्यांच्या खासगी आयुष्याबाबत कुतुहूल आहे. आता एलॉन मस्क यांनी त्यांच्या खाण्याच्या सवयीबद्दलची माहिती शेअर केली आहे. वारंवार उपवास केल्याने निरोगी वाटतं, असं त्यांचं म्हणणं आहे. एका चांगल्या मित्राने उपवास करण्याचा सल्ला दिला होता, असं त्यांनी सांगितलं आहे. 

एलॉन मस्कला यांनी असा सल्ला कुणी दिला?

टेस्लाचे सीईओ मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर सांगितले की, 'चांगल्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी वेळोवेळी उपवास करत आहे आणि निरोगी वाटत आहे.' मस्क यांनी पुढे सांगितलं की, 'याबाबत वेळोवेळी मी काही गोष्टी शेअर करणार आहे. जे माझ्यासाठी इतकी मेहनत घेत आहेत. जर तुम्हाला ते उपयुक्त वाटले तर...'  
एलॉन मस्कच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला आहे. मित्र म्हणजे नेमकं कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी तर नाही ना? असंही अनेक युजर्संनी विचारलं आहे.  मस्क यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना, एका युजर्सने उपहासात्मकपणे विचारले की, डॉर्सीने असा सल्ला दिला होता का? कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं होते की ते आठवड्यातून फक्त सात जेवण खातो.

उपवास करून किती वजन कमी केले असे विचारले असता एलॉन मस्क यांनी सांगितलं की, 'माझ्या वजनापेक्षा 20 पाउंड वजन कमी केलं आहे.' काही वर्षांपूर्वी, 'द जो रोगन एक्सपीरियन्स' पॉडकास्टच्या एका एपिसोडवर बोलताना, एलॉन मस्क यांनी सांगितलं होतं की, मला स्वादिष्ट अन्न खायला आवडते आणि व्यायाम केल्याशिवाय वजन कमी करण्याची इच्छा आहे.