realme 9i 5G स्मार्टफोन फक्त 749 रुपयात, या ऑफरबाबत जाणून घ्या

रियलमीच्या स्मार्टफोनमध्ये मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रियलमी 9i 5G नुकताच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. 

Updated: Aug 24, 2022, 04:36 PM IST
realme 9i 5G स्मार्टफोन फक्त 749 रुपयात, या ऑफरबाबत जाणून घ्या title=

Exchange Bonus On realme 9i 5G: रियलमीच्या स्मार्टफोनमध्ये मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रियलमी 9i 5G नुकताच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना सर्व ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 749 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची खासियत काय आहे आणि त्यावर काय ऑफर आहे.

Realme 9i 5G ची वैशिष्ट्ये आणि तपशील

Realme 9i 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना यामध्ये MediaTek डायमेंशन 810 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहक सहजपणे 1 TB पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल, दुसरा 2 मेगापिक्सल आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असून चांगला बॅकअप देते.

जाणून घ्या एक्सचेंज ऑफर

या स्मार्टफोनवर ग्राहकांना 16,250 रुपयांचा मजबूत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. या एक्सचेंज बोनसमुळे तुम्ही स्मार्टफोन फक्त 749 रुपयांमध्ये खरेदी करू शकता आणि फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची किंमत फक्त 16,999 रुपये आहे आणि 16,250 रुपये सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत फक्त 749 रुपये इतकी होते.