मुंबई: आपण फेसबुक स्क्रोल करतो तेव्हा अचानक आपल्यासमोर व्हिडीओ येतो. आवडला तर आपण क्लीक करतो. पण तो आपल्याला डाऊनलोड करायचा असेल किंवा आवडला असेल तर ते सध्या आपल्याला करता येत नाही. मग आपल्याला त्या व्हिडीओची लिंक सेव्ह करून ठेवावी लागते. आपल्याला फेसबुकवरचे व्हिडीओ आता डाऊनलोड करता येणार आहेत.
फेसबुकवरचा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी आज एक ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही ऑफलाइन व्हिडीओचा आनंद घेऊ शकता. मात्र फेसबुकच्या सुरक्षेबाबत सतर्क राहाणं गरजेचं आहे. कारण याबाबत सुरक्षेची काळजी छोट्या साइट घेत नाहीत. डेस्कटॉपवर फेसबुक व्हिडीओ कसा डाऊनलोड करायचा जाणून घेऊया
पहिल्यांदा ब्राऊझरवर तुमचं फेसबुक सुरू करा. त्यांनंतर तुम्हाला जो व्हिडीओ डाऊनलोड करायचा तो व्हिडीओ शोधा. त्या व्हिडीओवर क्लीक करा. तो सुरू झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट असलेलं चिन्हं असेल तिथे क्लीक करा. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये ही लिंक कॉपी करा. ही लिंक नव्या ब्राऊझरमध्ये सुरू करा.
URL साठी https://www मध्ये बदल करावा लागणार आहे. https://mbasic असा URL मध्ये बदल करा. त्यानंतर Enter बटन दाबा. व्हिडीओला राइट क्लिक करा. Open link in new tab हा पर्याय निवडा. नव्या टॅबमध्ये तुम्हाला फेसबुकचा व्हिडीओ मिळेल. त्यावर राईट क्लीक करून व्हिडीओ डाऊनलोड किंवा सेव्ह अॅज यापैकी एक पर्याय दिसेल. यापैकी एक पर्याय वापरून तुम्ही व्हिडीओ सेव्ह करू शकता.
आता तुम्हाला जर हे व्हिडीओ मोबाईल डिव्हाइसला सेव किंवा डाऊनलोड करायचे असतील तर कसे करता येतील असा प्रश्न पडला असेल. fbdown.net हा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे. तर आयफोन वापरणाऱ्यांना फायरफॉक्स ब्राऊझरचा वापर करावा लागणार आहे.
आपल्या डिव्हाइसमध्ये फेसबुक सुरू करा. त्यामध्ये जो व्हिडीओ पाहिजे त्यावर क्लीक करा. तीन डॉट असलेल्या आयकॉनवर क्लीक करा. तिथे खाली कॉपी लिंक पर्याय निवडा. त्यानंतर नव्या विंडोमध्ये fbdown.net हे ब्राऊझर सुरू करा. तिथे तुम्ही फेसबुकची लिंक जी निवडली ती कॉपी पेस्ट करा. त्यानंतर डाऊनलोडचा पर्याय निवडा आणि आपल्याला व्हिडीओ डाऊनलोड झालेला दिसेल.