नवी दिल्ली : केम्ब्रीज अॅनालिटिका स्कॅंडलनंतर युजर्सची प्रायव्हसी कायम राखण्यासाठी फेसबुने आता नवे पाऊल उचलले आहे. फेसबुकने युरोपमध्ये आपल्या युजर्सना नवी प्रायव्हसी सादर केली आहे. जी जनरल डेटा प्रोटेक्शन विनिमय (जीं.डी.पी.आर.)चा घटक आहे. आणि ही सेवा येत्या २५ मेपासून सुरू होणार आहे.
ही नवी प्रणाली लागू करण्यासाठी फेसबुकने नव्या टीमसोबत अतिषय सखोल अभ्यास केला आहे. ज्यात शेकडो कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जर तुम्हाला वेबसाईट आणि अॅपबाबत आपल्याला जाहिरातीसंबंधीत डेटासंबंधी प्रश्न आला तर, फेसबुक लोकांना सांगेन की हा मजकूर जाहिरात पुरस्कृत आहे. याबाबत आपण विचार करून निर्णय घ्या. आपण आमच्या भागिदाराकडून दाखवल्या जाणाऱ्या माहितीचा वापर करू इच्छिता किंवा नाही.
जर आपल्या प्रोफाईलवर राजकीय, धार्मिक आणि इतर संबंधांबाबत माहिती देण्याबाबत काही पोस्ट कराल तर, फेसबुक आपल्याला विचारेल आपण शेअर केलेली माहिती आपण कायम ठेऊ इच्छिता काय? फेसबुकचे उपाध्यक्ष आणि मुख्य गोपनीयता अधिकारी एरिन इगन यांनी एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली.