सन फ्रान्सिस्को : ख्राईस्टचर्चवरच्या हल्ल्याचं थेट प्रक्षेपण फेसबुकवर केल्यानंतर आता फेसबूकने थेट प्रक्षेपणावर बंधने घातली आहेत. फेसबूक गुन्हे शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सॅन्डबर्ग यांनी ही माहिती दिली. ख्राईस्टचर्चवरच्या हल्ल्यानंतर काही निकषांवर आधारित फेसबूकवर थेट कोण जाऊ शकेल यावर बंधने घालण्याचा कंपनी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने कंपनीकडून निरीक्षण केले जाणार आहे.
तसेच समाजात द्वेश पसवणाऱ्या मजकुराला लगाम घालण्यासाठी श्वेतवर्णीय वर्चस्ववाद आणि अलिप्तवादाचे समर्थन करणाऱ्या मजकुरावरही बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे. वंशभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या मजुरावरची ही बंदी पुढच्या आठवड्यापासून अंमलात आणली जाईल.