फेसबुकवर येतेय हे नवं कलरफूल फीचर

फेसबूकवर दिसणार हे नव कलरफूल फीचर 

Updated: Sep 8, 2017, 03:22 PM IST
फेसबुकवर येतेय हे नवं कलरफूल फीचर  title=

 मुंबई : दिवसेंदिवस फेसबुक अधिक युजर फ्रेंडली कसे होईल याकडे त्यांची टीम अधिक लक्ष देत आहे.  दर महिन्याला नवीन फीचर्स आणून  युजर्सना त्यांची सवय लावण्याचा प्रयत्न फेसबुककडून केला जातो. 
लवकरच अजून एक कलरफूल फीचर फेसबूकवर दिसण्याची शक्यता आहे. 
 
 काही दिवसांपूर्वी फेसबुकवर स्टेटस टाकताना त्यामागे काही कलरफूल टेम्पलेट्स ठेवण्याचा पर्याय फेसबुकने दिला. यामध्ये थीम वॉलपेपर्सचाही समावेश करण्यात आला आहे. पण असाच बदल आता कमेंट बॉक्समध्ये येणार आहे. ‘द नेक्स्ट वेब’ने फेसबुकच्या या नव्या फीचरची माहिती दिली आहे. 
 
कलरफुल कॉमेंट बॉक्सनंतर फेसबुक आणखी एका फीचर आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती ‘द नेक्स्ट वेब’ने दिलीआहे. लवकरच इन्स्टाग्राम स्टोरीज् फेसबुकवर लिंक करता येणार आहेत. फेसबुकवर फोटो स्टोरीचा पर्याय फार पूर्वीपासूनच उपलब्ध आहे, पण आता त्यात हे नवं फीचर युजर्सना उपलब्ध करून दिले जाईल.