मुंबई : प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सुद्धा आता स्मार्टफोन विश्वात एन्ट्री घेणार आहे. कंपनीच्या पेजवर Billion Capture+ नावाच्या स्मार्टफोनला लिस्ट करण्यात आलं आहे येत्या १५ नोव्हेंबरला या स्मार्टफोनवरून पडदा उठणार आहे.
फ्लिपकार्टवर लावण्यात आलेल्या बॅनरवर या फोनबाबत थोडी माहिती देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल कॅमेरासोबत बोके मोड, सुपर नाईट मोड आणि डेप्थ ऑफ फिल्ड इफेक्ट देण्यात आलंय. यात फुल एचडी डिस्प्ले असेल आणि एक सुपीरिअर प्रोसेसर तसेच लॉंग बॅकअप असलेली बॅटरी दिली आहे.
#CaptureIndia as it comes alive at night with its vibrant colors, festivals & celebrations with Billion Capture+. Coming Soon! #MadeForIndia #OnlyOnFlipkart. Know more: https://t.co/l8AZwj4egL pic.twitter.com/afW5dqebrE
— Flipkart (@Flipkart) November 8, 2017
या फोनसोबत अनलिमिटेद क्लाउड स्टोरेज दिलं जाणार आहे. हा फोन स्टॉक अॅन्ड्रॉईड ७.१ नूगावर रन होणार आहे. कंपनीने दावा केलाय की, ते या फोनसाठी १२५ शहरांमध्ये १३० सर्व्हिस सेंटर उघडणार आहेत. तसेच काही लॉन्च ऑफरही देणार आहेत.
फ्लिपकार्ड आणि अॅमेझॉनच्या सेल्सचा मोठा भाग स्मार्टफोनमधून येतो. त्यामुळे फ्लिपकार्टचं स्वत: या डोमेनमध्ये उतरणं सर्वांनाच धक्का देणारं आहे. ही पहिलीच वेळ नाहीये की, फ्लिपकार्ट आपलं हार्डवेअर डिव्हाईस उतरवला. कंपनीने याआधी डिजिफ्लिप प्रो सीरिजचे टॅबलेटही लॉन्च केले होते.