Instagram Down : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म असलेलं इंस्टाग्राम (Instagram Down) डाऊन झाल्याचं समजतंय. अनेक इंस्टाग्राम यूझर्सनी ट्विट करत लॉगईन (Log In) करण्यात अडचण येत असल्याचं म्हटलंय. इंस्टाग्राम डाऊन झाल्याने अनेक यूझर्स नाराज झालेत. तसेच अनेकांना संतापाचा सामना करावा लागतोय. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे इंस्टाग्राम डाऊन झाल्याचं कळवलंय. (social media platform instagram down users appear upset complain by tweeting and not log in)
अनेक यूझर्सना आधी मोबाईल डेटा संपल्याचं शंका होती. मात्र अनेकांनी डेटा ऑफ-ऑन करुन पाहिलं. काहींनी तर मोबाईल स्वीच ऑफ-ऑन करुन पाहिलं. मात्र त्यानंतरही इंस्टाग्राम नीट चालेना. त्यानंतर समजलं की इंस्टाग्राम डाऊन आहे. त्यामुळे यूझर्सचा संताप झाला. आतापर्यंत ट्विटरवर 37.7 हजार नेटकऱ्यांनी इंस्टाग्राम डाऊन झाल्याबाबत ट्विट केलंय. तसेच इंस्टाग्राम डाऊन झाल्याने नेटकऱ्यांनी मीम्सद्वारे खिल्लीही उडवली आहे.
People coming to Twitter to check whether Instagram is down again! #Instagramdown pic.twitter.com/pYTPuko1LC
— Patel Meet (@mn_google) September 22, 2022
दरम्यान इंस्टाग्राम डाऊन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा इंस्टाग्राम डाऊन झालंय. ठराविक काळाने इंस्टाग्राम डाऊन होत असल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता इंस्टाग्राम परत केव्हा पूर्ववत होणार, याकडे नेटकऱ्याचं लक्ष लागून राहिलंय.
Me calling my friend to check if Instagram is working... pic.twitter.com/bb5MhQVUIk
— HeelFinn (@Afreedali8) September 22, 2022