या चार सोप्या सेटिंग्जने मोबाईलची बॅटरी,डेटाही वाचेल

चार सोप्या सेटिंग्ज केल्या तर मोबाईलची बॅटरी दिर्घकाळ टिकण्यास मदत होते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 1, 2017, 01:54 PM IST
 या चार सोप्या सेटिंग्जने मोबाईलची बॅटरी,डेटाही वाचेल title=

मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक, फोन कॉलची क्षणाक्षणाची अपडेटसाठी मोबाईल महत्त्वाचा ठरतो. अशावेळी मोबाईलची बॅटरी टिकून राहणे हे खूप मोठे टास्क असते. चार्जिंग संपून ऐनवेळी पंचाईत होण्याचे किस्से आपल्यासोबत घडत असतात. म्हणून आपल्या मोबाईलमध्येच चार सोप्या सेटिंग्ज केल्या तर मोबाईलची बॅटरी दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेवूया...

मोबाईलमध्ये ईअरफोन लावून ठेवल्यास बॅटरी जास्त खर्च होते. त्यामूळे जर हेडफोनचा वापर करत नसाल तर तर तो फोनला कनेक्ट करू नका. 

सेटिंग्ज १

फेसबुक अॅप्लिकेशन मोबाइल बॅकग्राउंडला सुरू राहिल्याने फोनची बॅटरी जास्त खर्च होते. परंतु सेटिंग सेट करून आपण आपल्या फोनची बॅटरी वाचवू शकता.

सेटिंग्ज २

त्यासाठी सेटिंग्जमध्ये फेसबुक ऑप्शनवर गेल्यास तीन टॅप दिसतील. यात  डेटा सेव्हरचा ऑप्शन तुम्ही सुरू करा. त्यामूळे फेसबूक सुरू असताना आपोआप सुरू होणारे व्हिडिओवर लगाम लागेल आणि त्याने बॅटरी आणि डेटा वाचू शकेल.

सेटिंग्ज ३ 

फोनच्या सेटिंग्जमध्ये वाय-फाय पर्याय ऑप्शनवर टॅप करा. त्यात वाय फाय ड्यूरींग स्लीप या ऑप्शनला Never क्लिक करावे. यामूळे डेटा आणि बॅटरी देखील वाचणार आहे.

सेटिंग्ज ४ 

सेटिंग्जमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप डेटा ऑप्शनवर ऑटो डाऊनलोड बंद करा. त्यामूळे व्हॉट्सअॅपवर येणारे फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होणे बंद होईल.
यानेही तुमच्या फोनवर कमी बॅटरी आणि डेटा देखील कमीच खर्च होईल.