Cyberfraud: देशात सध्या दिवाळी सण सुरु झालाय. अशावेळी सरकारी सायबर एजन्सीने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. Free Diwali Gift चा मेसेज तुम्हाला आला असेल तर आताच सावध व्हा. असा मेसेज चुकीनही क्लिक करु नका. अन्यथा तुमचे दिवाळं निघाले म्हणून समजा.
दिवाळी निमित्त भेटवस्तूची ऑफर, असा मेसेज आला असेल तर लगेच अलर्ट व्हा. चीनी वेबसाइट यूसर्सची गोपनीय माहिती चोरण्याची युक्ती असू शकते. भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत CERT-In ने यूजर्सना मोठ्या ब्रँड्सना टार्गेट करणारे अॅडवेअर आणि फसव्या फिशिंग आणि ग्राहकांना फसवणाऱ्या घोटाळ्यांपासून सावध केले. जर तुम्हालाही मेसेज आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, इंस्टाग्राम इ.) फेक मेसेज फिरत आहेत, सणासुदीत ऑफरचा खोटा दावा करुन यूजर्सना गिफ्ट लिंक्स आणि बक्षिसे देऊन भुरळ घालतात. त्यामुळे सावध व्हा. तुमची फसवणूक करणारा बहुतेक महिलांना टार्गेट करत आहे. त्यांना व्हॉट्सअॅप/टेलिग्राम/इन्स्टाग्राम खात्यांवरील समवयस्कांमध्ये लिंक शेअर करण्यास सांगत आहे.
पीडित व्यक्तीला एक संदेश प्राप्त होतो, ज्यामध्ये लोकप्रिय ब्रँडच्या वेबसाइट्सप्रमाणेच फिशिंग वेबसाइटची लिंक असते आणि प्रश्नावलीचे उत्तर दिल्यावर बक्षीस किंवा विशेष सणाच्या ऑफरचा खोटा दावा केला जातो. सायबर हल्लेखोर नंतर यूजर्सना वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील, पासवर्ड, ओटीपी यासारखी संवेदनशील माहिती देण्याचे आमिष देतात किंवा अॅडवेअर आणि इतर प्रतिकूल हेतूंसाठी वापरतात. जो मेसेज पाठवलेला असतो तो चीनी डोमेनला संलग्न असतो. चीनी (.cn) डोमेन आणि अन्य एक्सटेंशन उदा. .top, .xyz अशा प्रकारे असते.
सरकारी सायबर एजन्सीने सल्ला देतना सांगितले आहे की, या आक्रमण मोहिमांमुळे संवेदनशील ग्राहक डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता प्रभावीपणे धोक्यात येऊ शकते आणि परिणामी आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकता. त्यामुळे आताच सावध व्हा.