जर्मनीप्रमाणे भारत सरकार स्मार्टफोन कंपन्यांकडे ग्राहक हिताची ही मागणी करेल का?

या देशानं अशी कोणती मागणी केलीय ज्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांना चांगलाच घाम फुटलाय...वाचा सविस्तर

Updated: Sep 6, 2021, 09:17 PM IST
जर्मनीप्रमाणे भारत सरकार स्मार्टफोन कंपन्यांकडे ग्राहक हिताची ही मागणी करेल का?

नवी दिल्ली: स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ग्राहकांची गरज ओळखून कंपन्याही स्मार्टफोनमध्ये स्मार्टपणे बदल करत आहेत. मात्र एका देशानं सर्व स्मार्टफोन कंपन्यांकडे एक अजब मागणी केली आहे. ही मागणी आहे सिक्युरिटी अपडेट आणि स्पेअर पार्ट्सची. आपल्या ग्राहकांची गरज ओळखून ग्राहक हितासाठी जर्मनीने सर्व मोबाईल कंपन्यांकडे एक मागणी केली आहे. अशी मागणी भारत सरकारही करणार का? असा अनेकजणांना प्रश्न पडला आहे. 

भारतात स्मार्टफोनचं मोठं मार्केट आहे. त्यामुळे आता भारतातही अशा प्रकारची मागणी करण्यात यावी अशी इच्छा अनेक युझर्सनी व्यक्त केली आहे. स्मार्टफोन तेव्हाच चांगला मानला जातो जेव्हा त्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही मजबूत असतात. हे स्मार्टफोन विकत घेण्यासाठी लोकांचे पैसे खर्च होतात आणि जर फोन कधीही खराब झाला तर दुरुस्तीमध्येही खूप खर्च येतो. 

बऱ्याचदा आपण फोन दुरुस्त करण्यापेक्षा नवीन घेण्यावर लक्ष देतो कारण त्या पैशांमध्ये अजून काही पैसे टाकले तर नवीन फोन येतो. फोन चोरी आणि डेटा चोरीच्या प्रकरणांमुळे आता सायबर सिक्युरीटी फोनमध्ये इनबिल्ड देणं ही गरज ठरली आहे. अशा परिस्थितीत जर्मनीने या स्मार्टफोन निर्मात्यांसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत. 

Heise ने सादर केलेल्या अहवालानुसार, जर्मनीने स्मार्टफोन कंपन्यांना प्रस्ताव दिला. या प्रस्तावानुसार स्मार्टफोन कंपन्यांनी प्रत्येक स्मार्टफोनसाठी 7 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट ऑफर द्यावी. तसेच, जर्मनीकडून अशी मागणी आहे की कंपन्यांनी त्याच कालावधीसाठी फोनचे काही पार्ट्सही कमी किमतीमध्ये उपलब्ध करून द्यावेत. 

युरोपियन युनियन (EU) स्मार्टफोनसाठी 5 वर्षांच्या वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट ऑफरवर विचार करत आहे. त्याच दरम्यान जर्मनीकडून ही मागणी समोर आली आहे. युरोपियन युनियनचा प्रस्ताव 2023 पर्यंत प्रभावी असू शकतो आणि पर्यावरणपूरक पाऊल मानले जात आहे.

अहवालात असेही म्हटले आहे. Heise ने अहवालात असेही म्हटले आहे की 'डिजिटल युरोप' या उद्योग संघटनेने सिक्योरिटी अपडेट्स 3 वर्षे आणि  फंक्शन अपडेट्स 2 वर्षे मागितली आहेत. ही संघटना फोन उत्पादकांचे प्रतिनिधित्व करते. बहुतेक स्मार्टफोन कंपन्या 2 ते 3 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट देतात. तर Apple आपल्या जुन्या मॉडेल्ससाठी आवश्यक असल्यास अपडेट जारी करते. जूनमध्ये, Apple ने जुन्या आयफोन मॉडेल आणि आयपॅडसाठी सॉफ्टवेअर अपडेट जारी केले. या अपडेटमध्ये मेमरी करप्शनची समस्या सोडवण्यात आली आहे.