नवी दिल्ली: चीन स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने भारतात नवा स्मार्टफोन फोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला 'स्मार्ट ३ प्लस' असे नाव देण्यात आले आहे. हा ३ रिअर कॅमेरा असलेला भारतातील सर्वात स्वत पहिला स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. भारतात ३० एप्रिलपासून या स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून या स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे.
इन्फिनिक्स स्मार्ट ३ प्लसमध्ये ६.२१ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी इतके स्टोअरेज वाढवता येणार आहे. स्मार्टफोनमध्ये ३ रिअर कॅमेरेचा समावेश करण्यात आला आहे. प्राइमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल तर सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सल आहे. सेल्फी कॅमेरा हा ८ मेगापिक्सल देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३ हजार ५०० एमएएचची क्षमता असलेली बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ऍन्ड्राईड पी व्हर्जन देण्यात आले आहे.