मोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे Offer

VIP मोबाइल नंबर हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या VIP Number Free मध्ये मिळवण्याची संधी मिळत आहे. जाणून घ्या कसं ते...  

Updated: Oct 17, 2022, 04:05 PM IST
मोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे Offer title=

VIP Number Free : अनेकांना आपल्या कार आणि मोबाइलसाठी खास नंबर हवा असतो. काही लोक लकी नंबरच्या मागे लागतात किंवा काहींना जन्मतारीख किंवा अ‍ॅनिव्हर्सरी सारख्या खास तारखा अशा नंबरमध्ये हव्या असतात. अशा नंबर्सना VIP Number म्हणतात. असे VIP Mobile नंबर्स हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या VIP Number Free मध्ये मिळवण्याची संधी मिळत आहे. ही शानदार ऑफर एका टेलिकॉम कंपनीने दिली आहे. 

व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबरची (VIP or fancy number) खूप क्रेझ आहे. यासाठी लोक भरपूर पैसा खर्च करण्यास तयार आहेत. पण, तुम्ही व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबरही मोफत मिळवू शकता. यासाठी एक टेलिकॉम कंपनी (Telecom Company) ऑफर देत आहे.

व्हीआयपी किंवा फॅन्सी क्रमांकांना असे म्हणतात ज्यामध्ये विशेष संख्यांचे संयोजन असते. यात तुमची जन्मतारीख किंवा कोणताही भाग्यवान क्रमांक देखील असू शकतो. तुम्हालाही व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर मोफत मिळवायचा असेल तर येथे संपूर्ण माहिती दिली आहे.

व्होडाफोन आयडिया (vodafone idea) आपल्या ग्राहकांना मोफत VIP किंवा फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी ऑफर (Offer) करत आहे. यासाठी तुम्हाला अतिशय सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. खास गोष्ट अशी आहे की, जर तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटर नंतर आवडत नसेल तर तुम्ही फॅन्सी नंबर दुसर्‍या टेलिकॉम ऑपरेटरला पोर्ट करू शकता.

वाचा : 'हे' 20 Apps खातात तुमच्या स्मार्टफोनची सर्वात जास्त बॅटरी, पाहा लिस्ट 

व्होडाफोन आयडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करा –

- Vodafone Idea वापरकर्त्यांना पोस्टपेड (postpaid) आणि प्रीपेड VIP किंवा फॅन्सी नंबर घेण्याची सुविधा देत आहे. यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला मेनूमधून नवीन कनेक्शनच्या विभागात जावे लागेल.
- नवीन कनेक्शनमध्ये तुम्हाला फॅन्सी नंबर श्रेणी देखील मिळेल. त्यानंतर तुम्हाला प्रीपेड (prepaid) किंवा पोस्टपेड कनेक्शनसाठी (postpaid connection) विचारले जाईल. म्हणजेच, तुम्हाला प्रीपेड कनेक्शन हवे आहे की पोस्टपेड कनेक्शन आहे हे तुम्ही निवडू शकता. यानंतर पिन कोडसोबत तुमचा मोबाईल नंबर (mobile number) द्यावा लागेल.
- यानंतर तुम्ही व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर निवडू शकता. जर तुम्हाला एखादा विशिष्ट क्रमांक आवडत असेल तर तुम्ही त्यातील तीन ते चार अंक टाकून नंबर शोधू शकता. त्यानंतर पर्यायातून तुमच्या पसंतीचा क्रमांक निवडा आणि पुढे जा.
- यानंतर तुम्हाला पर्यायातून एक योजना निवडावी लागेल. योजना निवडल्यानंतर, पेमेंट करा. पेमेंट पूर्ण केल्यानंतर, फॅन्सी नंबर तुमच्या घरी वितरित केला जाईल. हे कनेक्शन सक्रिय करून तुम्ही नवीन नंबर मित्रांसह शेअर करू शकता.