Viral Video : भांडी घासण्याच्या मशिनमध्ये गेला कॅमेरा; पुढे जे झालं त्याचा विचारही तुम्ही केला नसेल

वॉशिंग मशीन असो किंवा मग डिश वॉशर, एक बटण दाबल्यानंतर या यंत्रांच्या आत नेमकं काय सुरु असतं? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? सोशल मीडियावरचा हा Video पाहून हैराणच व्हाल 

Updated: Oct 17, 2022, 03:23 PM IST
Viral Video : भांडी घासण्याच्या मशिनमध्ये गेला कॅमेरा; पुढे जे झालं त्याचा विचारही तुम्ही केला नसेल  title=
how does dishwasher workes watch Viral video

Viral Video : दर दिवशी अगणित फोटो आणि त्याच तोडीस तोड असणारे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असतात. जगाच्या कोपऱ्यात कुठे काय सुरुये हे याच माध्यमातून आपल्याला कळतं. मुद्दा असा, की याच माध्यमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञाननाविषयी असणाऱ्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरंही आपल्याला मिळतात. एक Video पाहून तुम्हालाही ही बाब पटेल. कारण, हा व्हिडीओ आहेच तितका रंजक. 

तुम्ही कधी डिशवॉशर (Dishwasher) पाहिलंय का? भारतात तुलनेनं कमी वापरात असलं तरीही परदेशात अगदी सर्रासपणे गृहिणींच्या घरातील त्यांचा खास मित्र म्हणजेच हा डिशवॉशर मोठ्या मदतीचा ठरतो. एक बटण दाबलं, की खराब भांडी काही मिनिटांत स्वच्छ होतात. मांसाहारी पदार्थ शिजवलेल्या पदार्थांना तर वासही येत नाही. हे कसं बुवा होतं? 

आहे ना कुतूहलाचा प्रश्न? एक यंत्र चक्क भांडी घासतं हे ऐकणंच अनेकांसाठी अकल्पनीय. पण, हे खरंय. POVS Adventure या युट्यूब चॅनलवरून एक शॉर्ट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सिलिकॉन बॅगमध्ये गो प्रो कॅमेरा टाकताना दिसत आहे. 

उष्टी भांडी मशीममध्ये ठेवून त्यामध्ये साबण पावडर टाकून तो कॅमेराही आतच ठेवतो आणि पुढे नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी मशीन सुरु करतो. एक बटण दाबताच जणू जादू होते, पाण्याचे फवारे उडतात, साबणाचा फेस होतो आणि पाहता पाहता मशीनचा हा परफॉर्मन्स थांबतो. जणू एकाद्या नाटकाचा पडदाच पडतो. निकालस्वरुपी समोर असतात ती म्हणजे स्वच्छ, चकचकीच भांडी. 

अधिक वाचा : आली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील

तंत्रज्ञानाची किमया नेमकी कशी आणि किती ते या व्हिडीओमधून अगदी सहजपणे पाहता येत आहे. तुम्ही असं काहीतरी भन्नाट पाहिलंय का? पाहिलं असेल तर, कमेंटमध्ये कळवा.