स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ही आहे सुवर्ण संधी

जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

Updated: Jun 22, 2017, 11:25 AM IST
स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ही आहे सुवर्ण संधी title=

मुंबई : जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. तुम्ही स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर करुन प्री-जीएसटी सेलचा फायदा घेऊ शकता. कारण १ जुलैपासून जीएसटी होणार आहे. त्यामुळे हा कायदा लागू होण्याआधी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आपला स्टॉक खाली करण्याचा प्रयत्न करत आहे.

अनेक राज्यांमध्ये स्मार्टफोनवर वॅट ५ टक्के लागतो. पण आता जीएसटी लागू झाल्यानंतर १२ टक्के टॅक्स लागणार आहे. त्यामुळे अनेक कंपन्या सेल लावून जुना स्टॉक विकण्याचा प्रयत्न करत आहे.

अनेक कंपन्या ४९ टक्के सूट देत आहेत. फ्लिपकार्ट देखील लवकरच मैदानात उतरणार आहे. पेटीएम आधीच स्मार्टफोनवर सूट देत मैदानात उतरला आहे. आयफोन, सॅमसंग सारख्या स्मार्टफोनवर चांगले ऑफर्स मिळत आहेत. 

सरकारने आधीच म्हटलं आहे की, १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन्स, सीमेंट आणि मेडिकल डिवाइस खरेदी करायचे असेल तर ते तुम्हाला स्वस्तात मिळेल. स्मार्टफोनवर जीएसटी रेट १२ टक्के आहे. आता ग्राहकांना १३.५ टक्के टॅक्स द्यावा लागतो. यामुळे याचा फायदा ग्राहकांना होतो.