Interesting Facts about Google : गुगल कंपनीचे रोज डूडल पहायला मिळतात. मात्र, गुगलने (Google's 25th birthday) आज स्वत:साठी डुडल बनवलं आहे. गुगल आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करतोय. एका गॅरेजमध्ये सुरू झाली कंपनी आज मल्टी-मिलियन झाली आहे. संपूर्ण जगाला आपल्या बोटावर नाचवणारे हे सर्च इंजिन 1998 साली सुरू झालं होतं. मात्र, गुगलची सुरूवात कशी झाली होती? अन् गुगलचं नाव कसं पडलं याचा किस्सा पाहुया...
तुम्हाला एखाद्या गोष्टीचे उत्तर माहित नसेल तर तुम्ही सर्च करून ते शोधू शकता, त्यातील सर्वात प्रसिद्ध असं सर्च इंजिन म्हणजे गुगल. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का की या सर्च इंजिनचे नाव गुगल नसून ते चुकून पडलेलं आहे.
अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडी करत असलेल्या लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी मिळून हे सर्च इंजिन तयार केलं होतं. या दोघांनी 4 सप्टेंबर 1998 रोजी गुगल सुरू केलं. त्यावेळी त्याचं नाव काय ठेवायचं असा प्रश्न सर्वांना पडला. शोध इंजिन तयार केलं गेलं तेव्हा त्याला बॅकरुब (BackRub) असं नाव देण्यात आलं होतं. पण कंपनीची नोंद करायची होती, तेव्हा लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी GOOGOL नावानं कंपनीची नोंदणी करायची असं ठरवलं. मात्र, घोटाळा झाला...
GOOGOL या नावामागे एक गणितीय संज्ञा लपलेली आहे. ज्याचा अर्थ 1 आणि 00 म्हणजे 100 असा होतो. बायनरी डिजीटच्या अर्थाचा संदर्भ लावला गेला. मात्र, नोंदणी करताना शुद्धलेखनात चूक झाल्यामुळे त्याचे नाव GOOGOL ऐवजी Google झालं. गुगल नाव उच्चारणं देखील सोप्पं होतं. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा मात्र चांगलीच झाली.
Happy 25th birthday @Google! Thanks to everyone who uses our products and challenges us to keep innovating and to all Googlers! pic.twitter.com/bO3cI0DgvZ
— Sundar Pichai (@sundarpichai) September 27, 2023
आणखी वाचा - एक महिन्यानंतर 'या' स्मार्टफोनवर बंद होणार Whatsapp; ही यादी एकदा पाहाच!
दरम्यान, Google ची सुरुवात 4 सप्टेंबर 1998 रोजी झाली होती, परंतु त्याचा वाढदिवस दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यामागेही एक कारण आहे. इंजिनवर रेकॉर्ड शोध पृष्ठ जोडलं गेलं तेव्हापासून 27 सप्टेंबर रोजी वर्धापन दिन साजरा केला जाऊ लागला. त्याआधी 4 सप्टेंबर रोजीच वर्धापन दिन साजरा केला जात होता.