Google outage | जगभरातील अनेक देशांमध्ये अचानक गुगल डाऊन; नेटकऱ्यांकडून स्क्रीनशॉट शेअर

Google Search down: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सर्वर सकाळी 7 वाजेदरम्यान डाऊन झाल्याचे अनेक नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले.

Updated: Aug 9, 2022, 08:18 AM IST
Google outage | जगभरातील अनेक देशांमध्ये अचानक गुगल डाऊन; नेटकऱ्यांकडून स्क्रीनशॉट शेअर title=
Google Down

मुंबई : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सर्वर सकाळी 7 वाजेदरम्यान डाऊन झाल्याचे अनेक नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले. नेटकऱ्यांना Error 500  असा मॅसेज मिळत होता. अनेक नेटकऱ्यांना यासंबधीचा स्क्रिनशॉट Twitter वर #googledown या हॅशटॅगसह पोस्ट करीत आहे. खरे तर, Downdetector वर याबाबत फार रिपोर्ट आलेले नाहीत. नेटकऱ्यांना गुगल सर्च आणि साईट ओपन करण्यास अडचणी येत आहेत.

Google-Down

नेटकऱ्यांना येतोय हा मॅसेज
अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter वर गुगल डाऊन असल्याचे म्हटले आहे. नेटकरी #googledown या हॅशटॅगसह Error 500 असा मॅसेज असलेला स्क्रिनशॉट शेअर करीत आहेत.

गुगलची ही अडचण अनेक देशांमधील नेटकऱ्यांना जाणवली. परंतू 5-7 मिनिटांच्या आउटेजनंतर गुगलचे सर्वर पुन्हा सुरळीत काम करीत आहे. गुगलकडून या आउटेजबाबत अद्यापतरी सविस्तर माहिती शेअर करण्यात आलेली नाही. भारतातीलच नव्हे तर अनेक देशांमधील नेटकऱ्यांना ही समस्या जाणवली.