गूगलने लॉन्च केले मोबाईल डेटा वाचवणारे अॅप...

 जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी गूगल ने मोबाईल डेटा वाचवण्यासाठी एक अॅप लॉन्च केले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 2, 2017, 12:12 PM IST
 गूगलने लॉन्च केले मोबाईल डेटा वाचवणारे अॅप... title=

मुंबई : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी गूगल ने मोबाईल डेटा वाचवण्यासाठी एक अॅप लॉन्च केले आहे.

काय आहे खास ?

‘Datally’ असे या अॅपचे नाव असून हे अॅप अॅनरॉईड युजर्ससाठी आहे. या अॅपमुळे स्मार्टफोनमधील अधिक डेटा वापरणारे अॅप्स मॉनेटर आणि कंट्रोल करतो. त्याचबरोबर जवळच्या वायफाय हॉटस्पॉट देखील डिटेक्ट करतो.

हे अॅप खासकरून भारतीय यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन बनवले आहे. कारण येथे मोबाईल डेटा संपण्याची भीती अधिकतर लोकांना असते. हे अॅप सुमारे ५ लाख यूजर्सच्या माध्यमातून टेस्ट केले आहे आणि या यूजर्सनी साधारणपणे ३०% डेटा या अॅपच्या मदतीने वाचवला आहे.

कसे वापराल ?

  • हे अॅप गूगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करा.
  • अॅप सुरू करण्यासाठी लोकेशन, वायफाय, डिव्हाईस आणि अॅप हिस्ट्री यांसारखे गरजेचे एक्सेस द्यावे लागतात.
  • अॅपमुळे तुम्ही दर दिवशी वापरलेल्या डेटाचे डिटेल्स पाहू शकता.
  • मोबाईल डेटा वाचवण्यासाठी set up Data Saver हे ऑप्शन ऑन करा.
  • यामुळे बॅकग्राऊंडला चालू असलेले अॅप्स ब्लॉक होतात.