प्रवाशांना होणार गूगलच्या नवीन फिचरचा फायदा!

 गूगलने त्यांच्या गूगल मॅपमध्ये नवीन फिचर सुरू केले आहे.

Updated: Dec 17, 2018, 06:01 PM IST
प्रवाशांना होणार गूगलच्या नवीन फिचरचा फायदा!   title=

दिल्ली: युजर्सची गरज आणि मागणी ओळखून सातत्याने बदल करण्यात गूगल कायमच अग्रेसर असते. आता गूगलने त्यांच्या गूगल मॅपमध्ये नवीन फिचर सुरू केले आहे. या फिचरच्या माध्यमातून प्रवाशांना शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणता मार्ग आहे. आणि रिक्षातून जायचे झाल्यास त्यासाठी किती भाडे आकारले जाईल, ही माहिती गूगलमध्ये दाखविण्यात येईल. सुरुवातीला दिल्लीमध्येच हे फिचर असेल. त्यानंतर ते देशातील इतर शहरांतही सुरू करण्यात येईल.

याआधी खासगी प्रवासी वाहन बुक करण्यासाठी ओलासारख्या अॅपचा वापर करावा लागत होता. इतर कंपन्यांच्या तुलनेत गूगलने काही वेगळ्या प्रकारे सेवा देण्याचे ठरवले आहे. या सेवेत चारचाकी गाड्या नसून, ऑटोरिक्षाचा वापर करण्यात आला आहे. हे नवीन फिचर गूगल मॅपच्या सार्वजनिक वाहतूक आणि कॅब मोडमध्ये दाखवले जाणार आहे. दिल्लीतील वाहतूक पोलीसांचा यात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होत आहे.  

 

प्रवाशांना अशी होणारमदत

गूगल मॅपचे व्यवस्थापक विशाल दत्ता यांनी सांगितले की, प्रवाशांना रस्त्याची योग्य माहिती नसल्याने त्यांच्याकडून जास्त पैसे उकळले जातात. या फिचरच्या माध्यमातून चांगले नियोजन करता येईल. गूगल मॅपच्या मदतीने प्रवाशांना आधीच भाडे आणि रस्त्याची माहिती मिळणार आहे.

   

कोणत्या शहरासाठी असणार ही योजना 

गूगलने या सेवेची सुरुवात दिल्ली येथून केली आहे. इतर शहरात यासेवा कधी चालू करणार आहे, हे गूगलकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही. गूगल मॅपच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी अॅन्ड्राईड डिवाइसमध्ये गूगल मॅपला अपडेट करणे गरजेचे आहे.