मुंबई : प्रत्येक अॅण्ड्रॉइड युजरच्या गरजा वेगवेगळ्या असतात. हे लक्षात घेऊन गुगल त्याचे नवे अॅप बाजारात आणत आहे. गुगलने वेगवेगळ्या अॅपचे लाईट वर्जन नुकतेच लॉंच केले आहेत.
गुगलचे हे लाईट वर्जन कमी मेमरी वापरते. तसेच कमी बजेटवाल्या फोनमध्येही काम करते.
हे एप युजर फ्रेंडली असून यात खूप फिचर्सदेखील दिले गेले आहेत.
युजरला वेळोवेळी मेमरी क्लिनअपसाठी अनयूज्ड अॅप, छोटे व्हिडिओ आणि गॅलरीतील इतर फाइल्स काढून टाकण्याची माहीती देत राहील.
सध्या हे अॅप मोबाईलमध्ये उपलब्ध नाही. पण लवकरच ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.