Gmail वापरणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, गुगलने घेतला 'हा' निर्णय !

जीमेल वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी

Updated: Apr 1, 2021, 03:38 PM IST
Gmail वापरणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, गुगलने घेतला 'हा' निर्णय ! title=

मुंबई : तुम्ही जीमेल  (Gmai Users) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आली आहे. गूगलने जूनपर्यंत जीमेल वापरकर्त्यांसाठी विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वच्या सेवेसाठी वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागणार नाहीत.

गुगलने खास जीमेल युजर्ससाठी व्हिडीओ कॉलिंग सेवा जूनपर्यंत मोफत ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला व्हिडीओ कॉलिंग सेवेसाठी (Google Video Calling Service) कोणते पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कंपनीने ट्वीट करुन याबद्दल ही माहिती दिली. 

जीमेल युजर पैसे खर्च न करता 24 तास गूगल मीट सेवा वापरू शकतात. कंपनी यासाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही पैसे घेणार नाही. जर वापरकर्त्यांनी ही सेवा 24 तासांपेक्षा जास्त काळ वापरली तर त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत.

मागील वर्षी गुगलने आपल्या व्हिडिओ कॉलिंग सेवेचे नाव गुगल हँगआउट (google Hangout) हे बदलून गुगल मीटमध्ये (Google Meet) बदलले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने जीमेलच्या सर्व वापरकर्त्यांसाठी ही व्हिडिओ कॉलिंग सेवा विनामूल्य केली होती.

यानंतर गूगलने गुगल मीट ही विनामूल्य सेवा मार्च 2021 पर्यंत वाढविली. आता कंपनीने यावर्षी जूनपर्यंत ही सेवा मोफत ठेवण्याची घोषणा केली आहे.

Google Meet हे iOS आणि Android फोनमध्ये मोफत वापरु शकता. Google मीटमध्ये एकून 49 जणांना समाविष्ट करू शकता. गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान, गुगलने व्हिडीओ कॉलिंग फिचरसह जीमेलला अधिक आकर्षक बनविण्याची योजना बनविली.

गूगलने लॉकडाऊनमध्ये घरातून काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रुप आणि व्हॉईस कॉलिंगमध्ये युजर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला.