iPhone 15 ला टक्कर द्यायला येतोय गुगलचा Pixel 8; किंमत आणि फिचर्स एकदा वाचाच

Google Pixel 8 Series: आयफोन 15 घ्यायचा विचार करताय. तर थांबा कारण लवकरच Google Pixel 8 सीरीज लाँच होतेय. फिचर्स आणि किंमत जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 18, 2023, 09:17 AM IST
iPhone 15 ला टक्कर द्यायला येतोय गुगलचा  Pixel 8; किंमत आणि फिचर्स एकदा वाचाच  title=
Google Pixel 8 Series give close competition to Apple iPhone 15 featurs or price

Google Pixel 8 Series: आयफोन 15 सीरीज लाँच झाली असून कंपनीने स्मार्टफोनची प्री बुकिंगही सुरू केली आहे. तुम्हीपण आयफोन 15 घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. लवकरच गुगल पिक्सल 8 सीरीज लाँच होत आहे. येत्या 4 ऑक्टोबरमध्ये गुगल पिक्सल 8 लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने फोनच्या डिझाइनपासून ते फिचर्सपर्यंत अनेक बदल केले आहेत. आयफोन 15 ला टक्कर देण्यासाठी गुगलकडून काही भन्नाट फिचर्सही देण्यात आले आहेत. 

सूत्रांनुसार, 128 GB स्टोरेज असलेल्या Pixel 8 ची किंमत भारतात 60,000 ते 65,000 रुपयांपर्यंत असू शकते. अद्याप अधिकृत किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. या आधी लाँच झालेल्या स्मार्टफोनच्या लाँचिगच्या आधारे ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतात Pixel 8ची सीरीज अधिकृतरित्या 4 ऑक्टोबर रोजी लाँच होऊ शकतो. 

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

Pixel 8मध्ये कॉम्पॅक्ट 6.17 इंचाचा 120 HZ AMOLED डिस्प्ले असू शकतो. या डिस्प्लेचे वैशिष्ट्ये म्हणजे ब्राइटनेस आणि क्लियरिटी उत्तम आहे. यात गुगलचे शक्तिशाली Tensor G3देखील देण्यात आले आहे. कॅमेराचा सेटअप 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइट सेंसर आणि टाइम-ऑफ-फ्लाइट (टीओएफ) सेंसर देण्यात आले. स्मार्टफोनमध्ये 30fpsbवर 8k व्हिडीओ रेकोर्ड करण्याची क्षमता आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 11 मेगापिक्सलचा फ्रेंट कॅमेरा असल्याती शक्यता आहे. वायरलेस चार्जिंगची क्षमता असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 4,485mAhपर्यंत बॅटरी मिळू शकते. 

याउलट, Pixel 8 Pro मोठ्या 6.7-इंच QHD+ 120Hz OLED डिस्प्लेसह सुसज्ज असू शकतो. यात 11-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि एक मजबूत रियर कॅमेरा सेटअप देण्यात येऊ शकतो. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 64-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 49-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात येऊ शकतो. फोनची रचना मॉडेल Pixel 7 Pro प्रमाणेच असू शकते. 

Pixel 8 Pro ला 12GB RAM आणि 256GB स्टोरेज सारख्या वैशिष्ट्यांसह, जलद चार्जिंग क्षमतेसह 4,950mAh बॅटरीसह Google Tensor G3 SoC देण्यात येण्याची अपेक्षा आहे. Google Pixel 8 मालिकेतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रो चे Google Tensor G3 SoC आहे.