Google कडून महत्त्वाची सर्विस बंद करण्याचा निर्णय; तुमच्या स्क्रीनवरही दिसणार 'असा' एरर

Google Error : गुगलच्या कोणकोणत्या सर्विस तुम्ही वापरता? जाणून घ्या येत्या काळात कोणती सर्विस होणार बंद.... लक्षात ठेवा म्हणजे आयत्या वेळी पंचाईत नको.   

सायली पाटील | Updated: Jul 22, 2024, 09:42 AM IST
Google कडून महत्त्वाची सर्विस बंद करण्याचा निर्णय; तुमच्या स्क्रीनवरही दिसणार 'असा' एरर title=
Google to stop url shortening service know the reason and its impacts

Google Error : गुगलची सुरुवात झाल्या क्षणापासून आजच्या दिवसापर्यंत या माध्यमात काळानुरूप अनेक बदल करण्यात आले. त्यातच आता आणखी एका बदलाची भर पडली असून, यावेळी मात्र युजर्सना 440 वोल्टचा झटका बसला आहे. कारण, हा बदली तसाच आहे. 

येत्या काळात गुगलकडून वेबसाईटची लांबलचक लिंक लहान करता येण्याची मुभा असणारी सेवा बंद करण्यात येणार आहे. 'goo.gl' या नावानं वापरात असणाऱ्या या सेवेचं कामकाज 25 ऑगस्ट रोजी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं येत्या काळात तुम्ही 'goo.gl' च्या नावानं काही शोधण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या स्क्रीनवर एरर दिसू शकतो. 

हेसुद्धा वाचा : अशी ऑफर कुठेच नाही; 1,24,999 रुपयांचा सॅमसंगचा जगात भारी फोन मिळतोय 35 हजारांना... कसा? पाहा

गुगल युजर्सना मिळणार Warning 

गुगलकडून ही सेवा बंद करण्यापूर्वी युजर्सना काही सूचना केल्या जाणार आहे. या सूचना म्हणजे सदर सेवेची लिंक ओपन न करण्यासंदर्भातील Warning असणार आहे. सुरुवातीला गुगल निवडक लिंकवर यासाठीच्या सूचना देणार असून, जसजसी ही सेवा बंद होण्याची तारीख जवळ येणार आहे, तसतसी Warning अधिक प्रभावीपणे जारी केली जाणार आहे. 

सध्याच्या घडीला गुगलच्या शॉर्ट लिंकचा वापर करणाऱ्यांना तातडीनं या लिंक बदलण्याचा इशारा देण्यात आला आहे. असं न केल्यास या लिंकवर क्लिक करताच एखादं वेगळंच पेज युजर्ससमोर सुरु होणार असून, सर्फिंग आणि ब्राऊजिंगमध्ये व्यत्यय आणू शकतो. या अनोळखी पेजमुळं वेबसाईट स्लोसुद्धा होऊ शकते, शिवाय अमुक एक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करण्य़ाच्या प्रक्रियेत व्यत्ययही येऊ शकतो. 

सध्याच्या घडीला ज्या डेवलपर्सना गुगलच्या या सेवेमध्ये अडचणी निर्माण होताना दिसत आहेत, त्यांना "goo.gl" लिंकच्या शेवटी "?si=1" असं लिहिण्याचा सल्ला दिला जात आहे. असं केल्यास ब्राऊजिंगदरम्यान दिसणाऱ्या आणि नको असलेल्या वेब पेजला थांबवता येतं.