नवी दिल्ली : सध्या पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत बिकट होत आहे. त्यात वाढते प्रदूषण. त्यामुळे नवनवीन उपाय योजना काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीएनजीवर गाड्या काढण्यात आल्यात. आता तर त्यापुढे जाऊन इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना पुढे आली आहे. या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून अशा कार खरेदी करण्यांना सवलत देण्यात येत आहे. आता तर अशा गाड्यांवर हिरवी नंबरप्लेट्स असेल. आणि याचा लाभ हा टोल नाक्यावर मिळणार आहे. अशा वाहनांना टोल माफ होणार आहे.
प्रदूषण रोकण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना पुढे आली आहे. मात्र अद्याप चार्जिंग स्टेशनची सोय नसल्याने अशी वाहने घेण्यास अनेक जण धजावत नाहीत. येत्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट देण्यात असून त्यांना टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे. याबाबतचे आदेशही राज्य सरकारला केंद्राकडून देण्यात आले आहेत.
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना वेगळी ओळख देण्यासाठी नंबरप्लेट हिरव्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर नंबर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी राज्यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात नीती आयोगाने केंद्र सरकारसाठी एक प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी केंद्र सरकारची सात मंत्रालये आणि अवजड उद्योग मंत्रालय यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
खासगी टॅक्सीसाठी वापर होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना पार्किंग आणि टोल माफी करण्यात येणार आहे. हा फायदा या वाहनांना होण्यासाठी त्यांची नंबरप्लेट हिरव्या रंगाची असेल. देशात पाच प्रकारच्या नंबरप्लेट देशात खासगी वाहनांसाठी पांढरी, टॅक्सीसाठी पिवळी, स्वतः चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी काळी आणि सरकारी
अधिकाऱ्यांसाठी निळी नंबरप्लेट असलेली वाहने आहेत. तसेच कंपन्यांच्या कार ज्या शोरूम आणि टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जातात त्यांच्यासाठी लाल रंगाची नंबरप्लेट देण्यात आली आहे.