VIDEO | कोंबडीने ३ विषारी सापांना आपली पिलं वाचवण्यासाठी जेव्हा पंखाचे फटकारे दिले...

सोशल मीडियावर एकाच वेळी ३ सापांशी लढणाऱ्या या कोंबडीचं कौतुक होत आहे. अखेर कोंबडी देखील एक आई आहे.

Updated: Jun 6, 2021, 11:17 AM IST

मुंबई : सोशल मीडियावर एकाच वेळी ३ सापांशी लढणाऱ्या या कोंबडीचं कौतुक होत आहे. अखेर कोंबडी देखील एक आई आहे. तिच्या इवल्याशा पिल्लांवर ३ सापांनी हल्ला चढवला आहे, त्यांना वाचवण्यासाठी कोंबडीने आपल्या सर्वच पिलांना पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर आपल्या पंखांनी सापांना फटका देत कोंबडीने प्रतिकार सुरुच ठेवला आहे. एका आईने आपल्यापिलांसाठी सुरु ठेवलेली लढाई आणि तिच्यात आलेली शक्ती पाहून ३ सापांपैकी एकाने यातून काढता पाय घेतला आहे. आपल्या पिलांना वाचवण्यासाठी या कोंबडीने या सापांना पंखाचे फटकारे देणे सुरुच ठेवले आहे, पाहा हा व्हीडिओ...