मुंबई : आजच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. ज्यावर जवळ-जवळ आपण प्रत्येक काम करतो. फोनवर बोलणे आणि मेसेजेस सोबतच, फोटो काढणे, गाणी ऐकने, सिनेमा पाहाणे, गेम खेळणे, मेल करणे, पीडीएफ बनवणे यांसारखी अनेक कामं आपण मोबाईलवरतीच करतो. म्हणूनच याला मल्टीमीडिया डिव्हाइस देखील म्हणतात. मोबाईलमुळे आपली सर्व कामं पूर्ण होऊ लागल्याने ते आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे.
परंतु तुम्हाला माहितीय का की, यामुळे तुमचा धोका देखील तेवढाच वाढला आहे. कारण सध्या लोकं फोनवरुन ओनलाईने पैशांचे व्यवहार करु लागले आहेत. त्यामुळे जर एकाद्या व्यक्तीचा फोन हॅक झाला तर, त्याच्या फोनमधील संपूर्ण माहिती देखील दुसऱ्याच्या हातात जाऊ शकते. ज्याचा वापर चुकीच्या कामासाठी होऊ शकतो. तसेच याद्वारे तुमचे पैसे देखील चोरीला जाऊ शकतात.
सायबर क्राईमद्वारे व्हायरसचा फोनमध्ये प्रवेश एक सामान्य गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन व्हायरसपासून सुरक्षित ठेवू शकता. ज्यामुळे तुमचं नुकसान देखील होणार नाही.
तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे त्यावर पासवर्ड टाकणे. तुम्ही तुमचा फोन नेहमी तुमच्यासोबत ठेवता आणि अशा परिस्थितीत कोणीतरी तुमच्या फोनमध्ये डोकावते आणि त्यातून संपर्क किंवा डेटा चोरण्याचा प्रयत्न करते. हे टाळण्यासाठी फोनवर पासवर्ड ठेवा आणि ते कोणासमोरही उघडू नका.
तुमचा फोन वेळोवेळी नवीन आवृत्ती जारी करत असतो. ज्यामुळे तुमचा फोन जर अपडेट झाला तर, तुमच्या फोनवर व्हायरस हल्ला होण्याची शक्यता कमी होते.
ऑपरेटिंग सिस्टिममध्ये त्यांच्या अपडेट्समध्ये इतर सिक्युरिटी पॅचचाही समावेश असतो आणि त्यामुळे फोन वेळेवर अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या काळात फोनमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला नॉर्टन मोबाईल सिक्युरिटी सारखे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचे अनेक पर्याय सापडतील जे लोकप्रिय आहेत आणि ते चांगले काम करतात. तुम्ही तुमच्या फोनमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले पाहिजे जेणेकरून व्हायरस वेळेत ओळखता येईल आणि तुमचा फोन सुरक्षित राहू शकेल.
जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर तुमच्या फोनवरील अॅप्स फक्त Google Play Store वरून डाउनलोड करा आणि तुम्ही iOS वापरकर्ते असाल तर अॅप स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करा.
कोणत्याही साइटवरून किंवा कोणीतरी लिंक पाठवली म्हणून अॅप डाउनलोड करु नका. असे केल्याने व्हायरस आपल्या फोनवर सहजपणे हल्ला करु शकणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा की, कोणत्याही थर्डपार्टी ऍपमुळे फोनमध्ये व्हायरस घुसण्याची शक्यता जास्त आहे.
असे बरेच लोक असतील जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये लॉग इन करणं सोपे करण्यासाठी फोनवर त्यांच्या अॅप्सचे पासवर्ड सेव्ह करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हे पासवर्ड स्मार्टफोनमध्ये सेव्ह करू नयेत. कारण जर चुकून तुमचा फोन हॅक झाला किंवा चोरीला गेला तर हॅकर्सना अनेक अकाउंट्स आणि प्लॅटफॉर्मचा डेटा सहज मिळेल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)