Credit card Use : सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स चालू असतात. त्याचबरोबर ऑनलाइन (online shopping) खरेदी करतानाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स मिळतात. अशावेळी एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर अनेकजण लोक रोख रकमेचा वापर करण्यापेक्षा क्रेडिट कार्ड (credit card) वापरणे पसंत करतात. खरेदीनंतर बँक क्रेडिट कार्ड (credit card) ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स ( Rewad Points ) देतं. कार्डधारक किती पैसे खर्च करतोय त्यावर हे रिवॉर्ड पॉइंट्स अवलंबून असतात. तुम्हालाही मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स रिडिम केले नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं. जाणून घ्या क्रेडिट कार्डच्या या महत्वपूर्ण गोष्टी....
क्रेडिट कार्ड वापरताना बिल भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा. शेवटच्या तारखेपूर्वी नेहमीच बिल भरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपला सिबिल स्कोर मजबूत होईल. जर वेळेवर पैसे भरले नाहीत तर दंड भरावा लागेल आणि तुमचा सिबिल स्कोअरही खराब होईल.
क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढल्यास कंपन्या आपल्याकडून अधिक व्याज घेतात. रोख रक्कम काढण्यावर निश्चित शुल्क आकारले जाते. म्हणून क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढणे टाळा.
वाचा: नोकरकपातीची लाट! 'या' कंपनीने 6,650 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
जेव्हा क्रेडिट कार्ड बिल येतं तेव्हा त्यामध्ये बिल भरण्याच्या शेवटच्या तारखेसह बिल भरण्याची किमान रक्कम नमूद केलेली असते. ठरलेल्या तारखेला आपण संपूर्ण रक्कम जमा करण्यास अक्षम असल्यास,किमान रक्कम देण्याचा प्रयत्न करा. जर किमान रक्कमही भरली नाही तर बँकेकडून दंड आकारला जाईल. म्हणून आपण संपूर्ण बिल भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
क्रेडिट कार्ड मर्यादा संपूर्ण न वापरण्याचा नेहमीच प्रयत्न करा. आपण बऱ्याचदा मर्यादा पूर्ण वापरल्यास आपले क्रेडिट प्रोफाइल नकारात्मक होऊ शकते. म्हणून क्रेडिट मर्यादेचा पूर्ण वापर करणे टाळा.
आपला कार्ड तपशील कोणालाही सांगू नका. अनेकदा बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून आपल्याकडून क्रेडिट कार्डची आवश्यक माहिती मिळवतात. बँक आणि क्रेडिट कार्ड कंपन्या कधीही असे तपशील विचारत नाहीत. खरेदी करताना विशेषतः सावधगिरी बाळगा. आजकाल बऱ्याच ठिकाणी आपले कार्ड स्किमिंग (कॉपी करणे) होण्याची शक्यता आहे. यामुळे कार्डचा गैरवापर होऊ शकतो.
LIVE|
UAE
193/7(20 ov)
|
VS |
ITA
55/8(12.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
LIVE|
IND-A
111/2(10.3 ov)
|
VS |
NAM
|
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 208/7
|
VS |
USA
201/8(20 ov)
|
| New Zealand beat USA by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 161/6
|
VS |
NEP
162/4(18 ov)
|
| Nepal beat Canada by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 187/7
|
VS |
OMA
188/6(19.2 ov)
|
| Oman beat Zimbabwe by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.