Tata Punch की Hyundai Exter? किंमत, फिचर्सनुसार कोणती कार ठरते फायद्याचा सौदा? जाणून घ्या सविस्तर

Compare Hyundai Exter And Tata Punch: नव्या वर्षात कार खरेदी करण्याच्या विचारात तुम्हीही आहात का? ऑटो क्षेत्रामध्ये चलती असणाऱ्या कारपैकी तुमच्या बजेटमध्ये कोणती बसेल पाहून घ्या...   

सायली पाटील | Updated: Jan 3, 2024, 03:24 PM IST
Tata Punch की Hyundai Exter? किंमत, फिचर्सनुसार कोणती कार ठरते फायद्याचा सौदा? जाणून घ्या सविस्तर title=
Hyundai Exter Vs Tata Punch which car to buy know price features and other details auto news

Compare Hyundai Exter And Tata Punch: समाधानकारक पगार आणि बदललेल्या जीवनशैलीमुळं गेल्या काही वर्षांमध्ये कार बहुतांश कुटुंबांनी कार खरेदीसाठी प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. नव्या वर्षातही अनेक मंडळी कार खरेदीसाठीचे बेत आखताना दिसत आहेत. किंबहुना काहींनी तर, कोणती कार खरेदी करायची याचाही विचार केला असेल. तर, काही मंडळी मात्र कारच्या ठराविक मॉडेलमध्ये नेमकं कोणतं मॉडेल खरेदी करायचं याच विचारात पडले असतील. सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ह्युंडई एक्स्टर आणि टाटा पंच या दोन मायक्रो एसयुव्ही कारची बरीच चर्चा आहे. 

पंच आणि एक्स्टर या दोन्ही कारला कारप्रेमी वर्गातून कमालीची पसंतीसुद्धा मिळताना दिसतेय. पण, यातून तुमच्यासाठीचा योग्य पर्याय कोणता? पाहून घ्या. त्याआधी किंमत, फिचर्स आणि इतर बाबतीत या दोन्ही कारची तुलनाही करून पाहा. 

टाटा पंच ही कार एडवेंचर, अकंप्लिश्ड फिचर्स असून, यामध्ये कॅमो एडिशनही येते. या कारची मूळ किंमत 6 लाख रुपयांपासून सुरु होऊन 10.10 लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत जाते. तर, एक्स्टर या 5 सीटर मायक्रे एसयुव्हीमध्ये सुरुवातीची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरु होऊन हे दर 10.15 लाखांच्या घरात पोहोचतात. या दोन्ही कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत एकसारखीच आहे. पण, टॉप व्हेरिएंट टाटाचंच स्वस्त असल्याचं आकडेवारीवरून लक्षात येत आहे. 

फिचर्समध्ये कोण सरस? 

एक्स्टरमध्ये 8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 4.2-इंच एमआईडीसोबत डिजिटल ड्राइवर डिस्प्ले, क्रूज कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, सिंगल पॅन सनरुफ, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, ड्यूअल कॅमेरा, डॅश कॅम, 6 एअरबॅग, ईबीडी, एबीएस, हिल होल्ड असिस्ट, सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, टीपीएमएस, डे-नाइट आईआरवीएम,  रियर डिफॉगर आणि रियरव्यू कॅमेरा असे फिचर्स देण्यात आले आहेत. 

हेसुद्धा वाचा : Ewww 'ही' आहे भारतातली सर्वात घाणेरडी भाजी; तुमचंही हेच मत? 

 

टाटा पंचमध्येही एक्स्टरप्रमाणेच अनेक फिचर्स दिले जात असून, त्यात एत लहानसं टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीमही देण्यात आलं आहे. याशिवाय कारमध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटोमेटिक एसी, ऑटोमेटिक हेडलाइट्स असे फिचर्स देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कारमध्ये वायपर, क्रूज कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडी, एबीएस, रिअर पार्किंग कॅमेरा असे फिचर्स देण्यात आले आहेत. 

इंजिन आणि मायलेजमध्ये सरस कोण? 

पंचमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून, हे 3 सिलिंडर इंजिन 86 पीएस/113 एनएम पॉवर जनरेट करतं. कारचं सीएनजी मॉडेल 77 पीएस/97 एनएम पॉवर जनरेट करतं. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल/एएमटी गियरबॉक्स देण्यात आले असून, एक लीटर पेट्रोलमध्ये ती 20.09kmpl आणि सीएनजी पर 26.99kmpl मायलेज देते. 

एक्स्टरमध्ये 4 सिलिंडर इंजिन देण्यात आलं असून, कारला 5-स्पीड मॅन्युअल 5-स्पीड एएमटी गियरबॉक्स देण्यात आलं आहे. एका लीटरमध्ये ही कार 19.4kmpl आणि सीएनजी मॉडेल 27.1kmpl इतकं मायलेज देतं. आता ही सर्व माहिती मिळवल्यानंतर कोणती कार खरेदी करायची हे तुम्ही ठरवंय का?