Google Maps वर आता व्हॉट्सअॅपसारखं फिचर; लोकेशन शेअर करता येणार, कसं काम करतं वाचा!

Location Sharing Feature: गुगल मॅपने आणखी एक फिचर अॅड केले आहे. यामध्ये आथा युजर्सना थेट लोकेशन शेअर करता येणार आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 1, 2024, 06:24 PM IST
Google Maps वर आता व्हॉट्सअॅपसारखं फिचर; लोकेशन शेअर करता येणार, कसं काम करतं वाचा!  title=
Google Maps gets WhatsApp like location sharing feature know how is it work

Google Maps Location Sharing Feature: अँड्रॉइड युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.आता व्हॉट्सअॅपच्या लोकेशन शेअरिंग फिचरबाबत तर तुम्हाला माहितीच आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या युजरला आपले रिअल टाइम लोकेशन शेअर करु शकतात. आता याप्रमाणाचे फिचर गुगल मॅपवरही मिळणार आहे. गुगलने अलीकडेच गुगल मॅपचे एक नवीन फिचर जाहिर केले आहे. यात व्हॉट्सअॅपप्रमाणेच लोकेशन शेअरिंग फिचर देण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने आता तुम्हाला लोकेशन शेअर करायला कोणत्याही अतिरिक्त अॅपची मदत घ्यावी लागणार नाही. फक्त अँड्रोइड फोनमध्येच हे फिचर देण्यात आले आहे. त्यामुळ आता लोकेशन शेअर करण्यासाठी कोणतेही अन्य अॅप डाऊनलोड करण्याची गरज पडणार नाही. 

या फिचरचे फायदे

पहिले व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून युजर लोकेशन शेअर करु शकत होते. मात्र, गुगलचे हे फिचर थेट अँड्रोइड फोनमध्येच काम करते. त्यामुळं युजर्सना अतिरित्त अॅप डाउनलोड करण्याची गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फिचर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बंद करु शकता. तुम्ही तुमचे लोकेशन एका विशिष्ट वेळेपर्यंतच चालुही ठेवू शकता. म्हणजेच वेळ संपल्यानंतरही लोकेशन शेअर होणे बंद होईल. 

फिचरचा वापर कसा कराल!

सगळ्यात आधी तुमच्या अँड्रोइड डिव्हाअसवर आपल्या गुगल अकाउंटसह साइनइन करा आणि गुगल मॅप सुरू करा. 

यानंतर मेन्यू आयकॉनवर क्लिक करा आणि सर्चबारमध्ये संपर्काचे नाव शोधा

यानंतर तुम्हाला ज्याला तुमचे लोकेशन शेअर करायचे आहे तो कॉन्टेक निवडा. ती व्यक्ती तुमच्या गुगल कॉन्टेक्टमध्ये जोडली गेली हे देखील लक्षात ठेवा. 

कॉन्टेक्ट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला लोकेशन शेअर हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. 

नंतर तुम्हाला रिअर टाइम लोकेशन शेअर करायची असलेली वेळ निवडण्यास सांगितले जाईल. तुम्ही लोकेशन तुम्हाला हवं तितका काळ किंवा अनिश्चित काळासाठी शेअर करु शकता. 

तुम्हाला तुमचे लोकेशन शेअरिंग थांबवायचे असल्यास पुन्हा कॉन्टेक्टमध्ये जाऊन स्टॉप शेअरिंगवर क्लिक करा.