जिओनंतर आता आयडिया देतेय १०० टक्के कॅशबॅक ऑफर

जिओ आल्यानंतर मोबाईल नेटवर्क कंपन्या स्वस्त प्लानन्स देतायत. रिलायन्स जिओने आपल्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅकव्यतिरिक्त अनेक ऑफर्स आणल्यात.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 9, 2017, 03:35 PM IST
जिओनंतर आता आयडिया देतेय १०० टक्के कॅशबॅक ऑफर title=

नवी दिल्ली : जिओ आल्यानंतर मोबाईल नेटवर्क कंपन्या स्वस्त प्लानन्स देतायत. रिलायन्स जिओने आपल्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅकव्यतिरिक्त अनेक ऑफर्स आणल्यात.

आयडियाचाही १०० टक्के कॅशबॅक प्लान

त्यानंतर  आता आयडियानेही आपल्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅकची ऑफर आणलीये. आयडिया आपल्या ३५७ रुपयांच्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक ऑफर देतेय. एकदा ३५७ रुपयांचे रिचार्ज केल्यावर तुम्हाला ५१ रुपयांचे सात वाऊचर मिळतील. 

ही आहे अट

हे वाऊचर रिडीम करण्यासाठी २९९ रुपयांहून अधिक रुपयांचे रिचार्ज करावे लागले. एका वेळेस केवळ एकाच वाऊचरचा वापर केला जाऊ शकतो. याप्रमाणे तुम्ही सात वाऊचरमध्ये ३५७ रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता.

आयडियाच्या या ३५७ रुपयांच्या रिचार्जवर युजरला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी आणि रोमिंग कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय १.५ जीबी हायस्पीड डेटाही मिळतो. त्यासोबतच दिवसाला १०० मेसेजचीही सुविधा आहे.