Increase Motorcycle Mileage with Easy Tips: पेट्रोलचे दर वाढल्याने नागरिक गरजेपोटीच मोटारसायकल वापरू लागले आहेत. बहुतेक मोटारसायकलस्वारांना मायलेजमुळे त्रास सहन करावा लागतो. बाइकचा मायलेज हवा तसा नसल्याने बहुतेक जणांना इंधनासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जर तुमच्या मोटरसायकलचा मायलेजही कमी झाला असेल तर आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमच्या बाइकचा मायलेज आधीपेक्षा चांगला होईल.
गीअर हळू हळू शिफ्ट करा
गीअर्स शिफ्ट करताना तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे, असे केल्यास इंजिनवर जास्त दबाव येत नाही आणि मायलेज चांगला मिळतो. ही पद्धत खूप महत्वाची आणि प्रभावी देखील आहे.
जाड टायर वापरू नका
मोटरसायकलमध्ये नेहमी कंपनीचे टायर्स वापरा आणि असे केल्यास इंजिनावर दाब येत नाही आणि चांगला मायलेज मिळतो.
ओव्हरलोडिंग टाळा
बाइकवर कधीही ट्रिपल सीट घेऊ नका. कारण त्यामुळे इंजिनवर दबाव येतो आणि मायलेज लक्षणीयरीत्या कमी होतो.
हेवी ब्रेकिंग टाळा
मोटारसायकलमध्ये कधीही हेवी ब्रेकिंग करू नका, खरे तर हेवी ब्रेकिंगमुळे मोटरसायकलच्या इंजिनवर अचानक दाब वाढतो आणि इंजिन गरम होते. त्यामुळे पेट्रोलचा जास्त वापर होतो. नेहमी स्लो ब्रेकिंग करा.
वेळेवर सर्व्हिसिंग करा
बाइकची सर्व्हिसिंग वेळच्या वेळेस केल्यास नुकसान होत नाही आणि चांगला मायलेज देखील देते. वेळेवर सर्व्हिसिंग मायलेज वाढवण्यास खूप उपयुक्त ठरते. जर तुम्हालाही खराब मायलेजची समस्या भेडसावत असेल, तर वेळेवर सर्व्हिसिंग करा, यामुळे बाईकचे आयुष्य वाढेल आणि चांगला मायलेजही मिळेल.