Informative : मृत्यूनंतर आधार, पॅन आणि व्होटर ID चं काय होतं? आताच जाणून घ्या...

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या महत्वपूर्ण कागदपत्राचं काय करायचं किंवा त्या कागदपत्राचं काय होतं. तुमच्या मनातही हा प्रश्न उपस्थित होत असेल तर हा लेख नक्की वाचा.

Updated: Mar 14, 2023, 09:52 PM IST
Informative : मृत्यूनंतर आधार, पॅन आणि व्होटर ID चं काय होतं? आताच जाणून घ्या... title=

Informative : आपल्या प्रत्येकासाठी दोन महत्त्वाची कागदपत्र म्हणजे आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card). पासपोर्ट (Passport) असू दे किंवा बँकेत अकाऊंट (Bank Account) उघडायचं असेल तर व्हेरिफिकेशनसाठी (Verification) आधार आणि पॅन कार्डची गरजेचं असतं. इतकंच काय नवी नोकरीत रुजू होण्यासाठीही आधार आणि पॅन कार्ड महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असतं. आधार आणि पॅन कार्ड म्हणजे आपली ओळख. 

आधार, पॅन कार्ड आणि व्होटर आयडी (Voter ID) हरवल्यास किंवा त्याचा कुणी चुकीचा वापर केल्यास तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे सरकारकडून वारंवार आवाहन करतं, आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीला देऊ नका. तुमच्या आधार आणि पॅनकार्डच्या क्रमांकावरुन आरोपी लाखोंचा भ्रष्टाचार करु शकतात. ही खबरदारीची गोष्ट झाली. पण अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो, तो म्हणजे एखादा व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या आधार, पॅन कार्ड आणि व्होटर आयडीचं काय होतं. त्या क्रमांकाचा कुणी गैरवापर करु नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया निधनानंतर त्या व्यक्तीच्या आधार, पॅन आणि व्होटर आयडीचं काय होतं.

पॅन कार्ड
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी जाहीर केलेल्या 2023 च्या अर्थसंकल्पात (Budget 2023) पॅन कार्ड आता बिझनेस ओळखपत्राच्या रुपातही वापरता येणार आहे. कोणत्याही आर्थिक प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या कामात पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. अशात एखादी व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या पॅन कार्डचं खबरदारी घेणं गरजेचं आहे, अन्यथा दुरुपयोग होऊ शकतो.  कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्याच्या मृत्यू पश्चात आयकर विभागाला संपर्क साधून त्या व्यक्तीचं पॅन कार्ड रद्द करु शकता. पण रद्द करण्यापूर्वी या कार्डशी संबंधीत सर्व बँक खाती त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करुन घेणं गरजेचं आहे. 

आधार कार्ड
UIDAI द्वारे दिलं जाणारं आधार कार्ड एक युनिव्हर्सल आयडी (Universal ID) आहे. सरकारी योजनांचा लाभ घेताना आधारकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचं आधारकार्ड रद्द करण्याचा पर्याय सध्या नाही. पण त्याचं आधारकार्ड तुम्ही लॉक करु शकता. जेणेकरुन त्या आधारकार्डचा कोणीही गैरवापर करु नये.

व्होटर आयडी
मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी आवश्यक पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. अठरा वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे आणि त्यासाठी मतदान ओळखपत्र गरजेचं आहे. अशात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचं व्होटर आयडी रद्द करता येतं. यासाठी निवडूक आयोगच्या कार्यालयात जाऊन फॉर्म-7 भरावा लागतो. त्यानंतर त्या व्यक्तीचं व्होटर आयडी रद्द केलं जातं.