iPhone 11 Pro ला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवला आणि फटाके पेटवले....पुढे फोनचं काय झालं तुम्हीच पाहा

आता तुम्ही असा विचार कराल की, काय आता हा फोन खराब होणार का?

Updated: Aug 3, 2021, 05:45 PM IST
 iPhone 11 Pro ला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवला आणि फटाके पेटवले....पुढे फोनचं काय झालं तुम्हीच पाहा

मुंबई : यूट्यूबवर असे अनेक ब्लॉगर आहेत, जे लोकांना दाखवण्यासाठी वेगवेगळे गॅजेट्स विकत घेत असतात आणि त्यांचे रिव्यू व्हिडीओद्वारे आपल्याला सांगतात. आपण देखील कोणताही नवीन गॅजेट किंवा फोन घेण्याआधी यूट्यूबवरती व्हिडीओ किंवा रिव्यू पाहातो आणि मगच ते विकत घेतो.

तसेच यूट्यूबर त्यांचे Views वाढवण्यासाठी महागड्या फोनचे काही ना काही प्रयोग करत असतात आणि सांगतात की हा फोन किती मजबूत आहे. एका यूट्यूबरने असाच आयफोन 11 प्रो सोबत प्रयोग केला आहे. आपल्यासारख्या सर्व सामान्य लोकांना ते पाहून अश्चर्य वाटेल. कारण हा व्यक्ती आयफोन 11 प्रोला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवतो.

आता तुम्ही असा विचार कराल की, काय आता हा फोन खराब होणार किंवा याचं काहीच वाचणार नाही. परंतु यातून काही वेगळंच सत्य बाहेर आले आहे.

व्हायरल व्हिडिओ

TechRex च्या प्रसिद्ध YouTuber पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीने आयफोन 11 प्रो फोन फटाक्यांसह बॉक्समध्ये बंद केला.

नक्की काय केले? 

त्या व्यक्तीने आयफोन 11 प्रो घेतला. त्याने त्याला एका बॉक्समध्ये ठेवला. मग त्या नंतर त्याने वर भरपूर फटाके ठेवले. तो बॉक्स पूर्णपणे फटाक्यांनी भरलेला होता. नंतर त्या व्यक्तीने बॉक्सला कुलूप लावले. दोरी जाळण्यासाठी त्याने त्या बॉक्सला एक लहान छिद्र केले होते. त्याने दोरीला आग लावताच फटाके फुटण्यासा सुरुवात झाली.

जेव्हा फटाके पूर्णपणे फुटले तेव्हा त्या व्यक्तीने बॉक्स उघडला आणि त्यात आयफोन शोधायला सुरुवात केली. आयफोन हातात घेताच तो पूर्णपणे काळा झालेला दिसतो. परंतु तो जेव्हा फोनवरुन फटाक्यांची दारु साफ केली तेव्हा तो फोन पूर्णपणे चालू स्थितीत होता फोनला काहीच झाले नाही. तो चांगल्या परिस्थितीत होता. हा परिणाम खरंच आश्चर्यकारक होता. 

या व्हिडीओला 38 लाख 6 हजार 945 लोकांनी पसंत केलं आहे.