Nokia 3310 Vs iPhone 13 Pro Drop Test: स्मार्टफोन युग सुरू असूनही नोकियाच्या 3310 या फोनची चर्चा असते. कारण एक काळ नोकियाच्या या फोनने गाजवला आहे. फोनच्या टिकाऊपणामुळे मोबाईलप्रेमींची या फोनला पसंती होती. आता काळानुरूप फोनमध्ये बदल होत गेले आणि स्मार्टफोनचं युग सुरू झालं. त्यामुळे नोकिया 3310 इतका टिकाऊ फोन सध्या आहे का? याची चाचपणी करण्यात आली. यासाठी नोकिया 3310 आणि अॅपल आयफोन 13 प्रो या दरम्यान चाचणी घेण्यात आली. एका फेमस यूट्यूबरने टिकाऊपणा तपासण्यासाठी दोन्ही फोन छतावरून खाली फेकले.
iPhone 13 Pro vs Nokia 3310 Drop Test
Youtuber TechRax ने नोकिया 3310 सह अॅपल आयफोन 13 प्रोची ड्रॉप टेस्ट केली. नोकिया 3310 आणि अॅपल आयफोन 13 प्रो छतावरून एकत्र खाली टाकले. तुम्ही वाटलं असेल की, नोकिया 3310 ने बाजी मारली असेल, पण तसं नाही.
वरील व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेलचं आयफोनच्या बॅक पॅनेलमध्ये क्रॅक आला होता. पण स्क्रिन चांगल्या स्थितीत होती. तर नोकिया पूर्णपणे तुटला होता. त्यानंतर TechRax आयफोन 13 प्रो दुसऱ्यांदा छतावरून फेकला तरी स्क्रिन सुरु होती आणि स्क्रॅच आला नव्हता. तिसऱ्यांदा फेकल्यानंतर बॅक पॅनल खराब झालं आणि स्क्रिन सुरु होती. अखेर हा सामना आयफोन 13 प्रो जिंकला, हे स्पष्ट झालं आहे.