जिओ धन धना धन : ११२ जीबी डेटा फ्री, फ्री, फ्री

 युजरला ११२ जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा ५६ दिवसांपर्यंत वापरता येणार आहे.

Pravin.Dabholkar Updated: Apr 27, 2018, 06:15 AM IST
जिओ धन धना धन : ११२ जीबी डेटा फ्री, फ्री, फ्री  title=

मुंबई : मोबाइल इंडस्ट्रीमध्ये धमाका करणाऱ्या रिलायन्स जियोने आणखी एक धमाका केलाय. यावेळी जिओने ५६ दिवसांसाठी ११२ जीबी ४ जी डेटा फ्रि दिला आहे. पण यासाठी तुम्हाला एक छोटस काम कराव लागणार आहे. रिलायन्सच्या या नव्या ऑफरच नाव जियोफोन मॅच पास आहे. या ऑफरनुसार यूजर्स आपल्या मित्रांना जिओफोन खरेदी करण्यासाठी आमंत्रित करु शकतात. कंपनीच्या नव्या ऑफरमध्ये ११२ जीबी डेटा फ्री मिळेल, ज्याची वैधता ५६ दिवसांची असेल. जर जियोफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला १८००-८९०-८९०० नंबर वर फोन करावा लागेल. फोन खरेदी करताना ग्राहकांना आपला मोबाइल नंबर आणि विभाग पिनकोड द्यायला हवा. जर इनवाइटरमध्ये तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने फोन खरेदी केला तर तुम्हाला ८ जीबी डेटा ४ दिवसांच्या वॅलिडिटीसह मिळणार आहे.

शोमध्ये सहभागी व्हा 

जियो युजर्सच्या १० मित्रांनी फोन खरेदी केल्यास युजरला ११२ जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा ५६ दिवसांपर्यंत वापरता येणार आहे. यासोबतच सर्वाधिक मित्रांना फोन खरेदी करण्यास प्रोत्साहित केल तर  Jio Dhan Dhana Dhan  शोमध्ये भाग घेता येणार आहे.