मुंबई: जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना
आजचा Kiss Day अधिक आकर्षणाचा विषय आहे. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी Kiss करणं हे उत्तम साधन समजलं जातं. सिनेमांच्या मार्फत अनेकदा किसचे वेगवेगळे प्रकार समोर येतात. पण तश्या पद्धतीने किस करण्याचा नेमका अर्थ काय? हे मात्र अनेकांना माहित नसतं. तर आज Kiss Day च्या निमित्ताने हेच जाणून घेणार आहोत.
फोर हेड किस : हा किस तुम्ही एखाद्याचे मित्र असल्यास केला जातो . बरेच जण हा किस स्टार्टर म्हणून वापरतात.
वॅम्पायर किस : मोठय़ा त्वेषाने एखाद्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीच्या मानेवर किस करणे म्हणजे वॅम्पायर किस. हा एक मनोरंजनात्मक किसिंग प्रकार म्हणूनही ओळखला जातो.
सिंगल लिप किस : प्रियकर आणि प्रेयसीमध्ये प्रेमभावना व्यक्त करताना तीव्र ओढीने केला जाणारा किस हा ‘सिंगल लिप किस’ म्हणून ओळखला जातो. अमेरिका, आफ्रिका, इंग्लंड अशा काही देशांत हा प्रकार लोकप्रिय आहे.
टीझर किस : बर्याच दिवसांनी भेटणार्या व्यक्तीविषयी प्रेम दर्शविण्यासाठी कपाळावर, ओठ, हातांवर चुंबन घेण्याला ‘टीझर किस’ म्हणून ओळखले जाते. हे दर्शविण्यासाठी टीझर किस केला जातो.
लिंजरिंग लिप :एकमेकांप्रती तीव्र प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी लिंजरिंग लिप किस केला जातो. अतिप्रेम व्यक्त करताना असा किस केला जातो. यात केवळ ओठांद्वारे 20 सेकंदांचा किस केला जातो.
बटरफ्लाय किस : आनंद किंवा मौज दर्शविताना ‘बटरफ्लाय किस’ केला जातो. यात डोळ्यांच्या पापण्या फुलपाखराप्रमाणे जलदगतीने उघड-बंद करून आनंद व्यक्त केला जातो. ‘जिनी और जूजू’ मालिकेतील जिनी या किसमुळे तरुणींमध्ये प्रसिद्ध आहे.
हॅण्ड किस : एकमेकांप्रती आदर, उपकार, कृपा दर्शविण्यासाठी हातांवर किंवा हातांच्या बोटांवर मागील बाजूस किस केला जातो. त्याला ‘हॅण्ड किस’ म्हणून ओळखतात.
चिक किस : मैत्री दर्शविण्यासाठी किंवा फ्लर्ट करण्यासाठी गालांवर केला जाणारा किस म्हणजे चिक किस. एखाद्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीला निरोप देताना या किसचा वापर केला जातो.
एस्किमो किस : एस्किमो किसद्वारे पालक वात्सल्याची भावना व्यक्त करत असतात. पालक पाल्याच्या नाकाला नाक स्पर्श करतात. टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक असे किस करतात, म्हणून त्याला ‘एस्किमो किस’ असे म्हटले जाते.
१. दात चमकदार राहतात
किस करताना जी लाळ तयार होते ती दात किडण्यापासून दातांचे संरक्षण करते. दातांवरील अन्नाचे कण आणि काही जंतुंचा नायनाट करण्यास मदत होते. यामुळे दात किडत नाहीत आणि ते लाळेमुळे धुतले गेल्याने चमकदार राहतात.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
सिटोमेगॅलोव्हायरस नावाचा विषाणू हा महिलांसाठी गर्भावस्थेच्या काळात धोकादायक ठरू शकतो. किसिंग या विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते.
३. कॅलरीज कमी करणं
किस केल्याने एका मिनिटात २-३ कॅलरीज बर्न होतात. म्हणून जर तुम्हाला वजन घटवायचे असेल तर हा उपाय लाभदायक ठरू शकतो.
४. ताण कमी करणं
तुम्हाला जर तुमच्या कामाचा रोज ताण होत असेल तर एक किस त्यावर चांगला फायदा करू शकते. किस केल्यावर शरीरात सकारात्मक भावना निर्माण होतात. एक किस तुम्हाला दिवसभरातील अनेक दुःख विसरायला मदत करू शकते.
५. चेहऱ्यावरील त्वचा नितळ ठेवते
किस करताना चेहऱ्यावरील काही पेशी ओढल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात आणि त्वचा नितळ राहते