Yamahaची नवी बाईक लवकरच बाजारात

Yamahaची नवी बाईक १९ डिसेंबर २०१९ रोजी लॉन्च होण्याची शक्यता 

Updated: Oct 26, 2019, 08:00 PM IST
Yamahaची नवी बाईक लवकरच बाजारात title=

नवी दिल्ली : १ एप्रिल २०२० पासून एमिशन स्टँडर्टचं नवं मानक BS VI सरकार लागू करणार आहे. त्यामुळे कंपन्या आपल्या गाड्यांमध्ये BS VI या नव्या मानकाप्रमाणे बदल करत आहेत. टू व्हीलर कंपनी 'यामाहा'ने,  Yamaha R3 BS VI चं २०२० मॉडेल, १९ डिसेंबर २०१९ रोजी लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली आहे. कंपनीने यासाठी बुकिंगही सुरु केल्याची माहिती आहे. 'यामाहा इंडिया'ने, नोव्हेंबरपासून आपल्या मोटरसायकल आणि स्कूटर BS VI मध्ये अपग्रेड करण्यास सुरुवात करणार असल्याचं सांगितलं.

'यामाहा इंडिया', नोव्हेंबर २०१९ पासून बीएसच्या (BS) नव्या मानकानुसार, वाहन लॉन्च करण्यास सुरुवात करणार आहे. 

2020 Yamaha R3 BS VI या गाडीची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. BS VI मुळे मोटरसायकल बनवण्याची किंमत वाढल्याने, गाडीच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.

  

2020 Yamaha R3 BS VI मिडनाइट ब्लॅक आणि आयकन ब्लू रंगात उपलब्ध होणार असून, गाडीच्या डिझाइन, स्टाइलमध्येही बदल केले असल्याची माहिती मिळत आहे.