व्हॉट्सअ‍ॅपवर ठरवाल त्यालाच दिसणार DP,अशी बदला सेटिंग

आपला डीपी कुणी पाहू नये, असा काही जणांचा मानस असतो. तर फ्रेंडलिस्टमधील काही जणांना डीपी दाखवायचा असतो, मात्र सोयीनुसार डीपी लपवता येत नाही.

Updated: Oct 19, 2022, 09:42 PM IST
व्हॉट्सअ‍ॅपवर ठरवाल त्यालाच दिसणार DP,अशी बदला सेटिंग title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप  (WhatsApp) कायम आपल्या यूझर्सना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने नवनवीन बदल करत असते.  विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप यूझर्सच्या प्रायव्हसीला कायम प्राधान्य देत आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप त्या हिशोबाने अनेक फीचर आणत असते. या प्रायव्हसी फीचर्सचा वापर करुन चॅटिंगचा अनुभव आणखी दमदार होईल. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर डीपी हाईड करु शकता. (know how to hide your whtsapp dp follow step)

आपला डीपी कुणी पाहू नये, असा काही जणांचा मानस असतो. तर फ्रेंडलिस्टमधील काही जणांना डीपी दाखवायचा असतो, मात्र सोयीनुसार डीपी लपवता येत नाही. त्यामुळे अनेकदा गोची होती. मात्र ही अडचण व्हॉट्सअ‍ॅपने नेमकी हेरली. आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवर ठरवाल त्यालाच डीपी दिसेल अशी सेटिंग कशी करायची हे जाणून घेऊयात.

अशी बदला सेटिंग

-व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन सेटिंगमध्ये जा. 

-सेटिंगमध्ये गेल्यावर Privacy वर क्लिक करा.

- प्रायव्हसीमध्ये Last Seen, Online, Profile Photo आणि इतर ऑप्शन मिळतील. 

- प्रोफाईल फोटो (Profile Photo) या ऑप्शनवर क्लिक करा. 

-Profile Photo ऑप्शनवर क्लिक करा. 

Everyone, My Contact, My Contact except आणि Nobody असे 4 ऑप्शन दिसतील. इथे प्रायव्हसीनुसार पर्याय निवडा. अशा प्रकारे तुमचा डीपी कोण पाहणार हे ठरवता येईल.