WhatsApp : ऑनलाईन असूनही दिसणार नाही, व्हॉट्सअ‍ॅपचं जबरदस्त फिचर

असंख्य यूझर्सच्या प्रायव्हसीसाठी हे फीचर जोडलं गेलंय. या लेटेस्ट फीचर्सच्या मदतीने ऑनलाईन स्टेटस (WhatsApp Online Status) लपवू शकता.  

Updated: Oct 8, 2022, 06:44 PM IST
WhatsApp : ऑनलाईन असूनही दिसणार नाही, व्हॉट्सअ‍ॅपचं जबरदस्त फिचर title=

मुंबई : देशातील लाखो यूझर्स हे (WhatsApp) व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. यूझर्सना वेळोवेळी काही तरी नवीन द्यावं या उद्देशाने व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतंच स्क्रीनशॉट ब्लॉक (ScreenShot) करण्याचं फीचर आणलंय. या फीचरच्या मदतीने View Once मोडमध्ये पाठवलेल्या फोटोचं कुणीही स्कीनशॉट घेऊ शकत नाही. आता व्हॉट्सअ‍ॅपसह आणखी एक फीचर जोडलं गेलंय. (know how to hide your whtsapp online status like last seen) 

असंख्य यूझर्सच्या प्रायव्हसीसाठी हे फीचर जोडलं गेलंय. या लेटेस्ट फीचर्सच्या मदतीने ऑनलाईन स्टेटस (WhatsApp Online Status) लपवू शकता. व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर लाईव्ह झालंय. यासाठी यूझर्सना सेटिंगमध्ये बदल करावा लागणार आहे. यानंतर तुम्ही ऑनलाईन असूनही दिसणार नाहीत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, ज्याप्रमाणे आपण लास्ट सीन लपवतो त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन आहात की नाही, हे या फीचरच्या मदतीने लपवू शकता.  

अशी बदला सेटिंग?  

सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. सेटिंगमध्ये (WhatsApp Setting) जा. प्रायव्हसीवर (Privacy) क्लिक करा. त्यानंतर सर्वात आधी लास्ट सीन अ‍ॅन्ड (Last Seen and Online) या पर्यायावर क्लिक करा.  क्लिक केल्यानंतर लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस असे  2 पर्याय दिसतील. 

ऑनलाईन स्टेटसवर क्लिक केल्यानतंर इथेही 2 ऑप्शन दिसतील. यामध्ये एव्हरीवन (Everyone) हा पहिला पर्याय दिसेल. याचाच अर्थ असा की तुम्ही ऑनलाईन आहात की नाहीत हे तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्यांना दिसेल. तर दुसरा  पर्याय Same As Last Seen हा असेल.

तुम्ही जर लास्ट सीनमध्ये  नोबडी (Nobody) अशी सेटिंग केली असेल, तर तीच सेटिंग या Same As Last Seen ऑप्शनवर लागू होईल. म्हणजेच तीच सेटिंग Online Status वर लागू होईल. 

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लास्ट सीनसाठी एकूण Everyone, My Contacts, My Contacts Expect आणि Nobody असे एकूण  4 पर्याय असतात. या 4 पैकी कोणताही एक पर्याय तुमच्या सोयीनुसार निवडू शकता.  

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ऑनलाईन असल्याचं कुणालाही कळू नये, तर तुम्हाला Nobody हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर ऑनलाईन स्टेटससाठी लास्ट सीन सेटिंगला मार्क करावं लागेल. अशाप्रकारे ऑनलाईन स्टेटस लपवू शकता.