तुम्हाला दुसऱ्याचं Whatsapp स्टेटस आवडलं, आता मागत बसण्याची गरज नाही

चॅटिंगसाठी व्हॉट्सअपचा (Whatsapp) मोठ्या प्रमाणात केला जातो.   

Updated: Jul 18, 2021, 10:03 PM IST
तुम्हाला दुसऱ्याचं Whatsapp स्टेटस आवडलं, आता मागत बसण्याची गरज नाही

मुंबई : चॅटिंगसाठी व्हॉट्सअपचा (Whatsapp) मोठ्या प्रमाणात केला जातो. यूझर्सला चॅटिंगचा चांगला अनुभव मिळावा, म्हणून व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन फीचर्स देत असतं. काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस फीचर आणलं होतं. या स्टेटस फीचरला यूझर्सनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रत्येक जण व्हॉट्सअ‍ॅपच्या या स्टेट्सद्वारे मेसेज, फोटो, व्हीडिओ शेअर करत असतात. आपले मित्र व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटसला व्हीडिओ आणि फोटो ठेवतात. त्यापैकी काही व्हीडिओ आणि फोटो आपल्याला आवडतात. त्यामुळे आपण ते फोटो आणि व्हीडिओ मागून घेतो किंवा फोटो स्टेटसचा  (Stauts Download) स्क्रीनशॉट काढावा लागतो. पण आता हे झोलर धंदे करण्याची गरज नाही. आता हे स्टेटस थेट डाऊनलोड करता येणार आहे. हे स्टेटसला असणारे व्हीडिओ आणि फोटो डाऊनलोड कसे करायचे, हे आपण जाणून घेणार आहोत. (know to how to download whatsapp status follow this tips)

 

Whatsapp स्टेटस डाउनलोड करण्यासाठी Status downloader for Whatsapp हा अ‍ॅप डाऊनलोड करावा 

हा अ‍ॅप ओपन केल्यावर दोन पर्याय दिसतील. यामध्ये एक क्लिक टू चॅट आणि दुसरा स्टेटस डाऊनलोडर, असे पर्याय दिसतील. 

यामधून यूझर्सला स्टेटस डाऊनलोडर पर्याय निवडावा. यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टकॅट लिस्टमधील मित्रांचे स्टेटस फोटो आणि व्हीडिओ दिसतील.  

यूझर्सला फोटो किंवा व्हीडिओ जे हवं असेल त्यावर क्लिक करावं. क्लिक करताच तो फोटो किंवा व्हीडिओ तुमच्या मोबाईल गॅलरीत सेव्ह होईल.  

यानंतर यूझर्सला फाईल मॅनेजरमध्ये जाऊन तिथे स्टेटस डाऊनलोडर फोल्डरमध्ये हे सेव्ह झालेले स्टेटस नजरेस पडतील. 

विशेष आणि लक्षात घेण्याची बाब म्हणजे हे स्टेटस डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅपचा उपयोग करावा लागेल.