Electric Scooter | अवघ्या २४ तासात 'या' कंपनीच्या १ लाख स्कूटर बूक

ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात या इलेक्ट्रिक स्कूटरला भरघोस प्रतिसाद दिलाय.

Updated: Jul 18, 2021, 09:10 PM IST
Electric Scooter | अवघ्या २४ तासात 'या' कंपनीच्या १ लाख स्कूटर बूक

मुंबई : ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरने लॉन्च होण्याआधीच विक्रम केलाय. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात या इलेक्ट्रिक स्कूटरला भरघोस प्रतिसाद दिलाय. अवघ्या 24 तासांमध्ये ग्राहकांनी प्री बुकिंग सुरु झाल्यानंतरच्या 24 तासांच्या आताच 1 लाखांपेक्षा अधिक स्कूटर बूक केल्या आहेत. ही स्कूटरची बूकींग रक्कम ही केवळ 499 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे ही रक्कम परत देखील मिळणार आहे. ही बाईक लवकरच लॉन्च केली जाणार आहे.  ग्राहकांनी भरभरुन दिलेल्या प्रतिसादामुळे येत्या काही दिवसात ही स्कूटर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कारनामा करेल, असं  म्हंटलं जातंय. (1 lakh people booked OLA electric scooters in 24 hours before launch)

विशेष म्हणजे जानेवारी ते जून 2021 दरम्यान भारतात एकूण 30 हजार यूनिट इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची विक्री करण्यात आली आहे. ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला लोकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. ओलाचे चेयरमन भाविश अग्रवाल म्हणाले की, "ग्राहकांकडून मिळालेल्या या प्रतिसादामुळे भारावून गेलोय. ज्या ग्राहकांनी ही स्कूटर बूक केलीय, त्यांना मी धन्यवाद देतो. ही फक्त सुरुवात आहे."

बाईकचे फीचर

ज्या ग्राहकांनी या इलेक्ट्रीक स्कूरटरची प्री बूकिंग केलीय, त्यांना ही बाईक लॉन्च झाल्यावर प्रथम प्राधान्य देण्यात येईल. या बाईकची स्पीड रेंज ही 100-150 इतकी असण्याची शक्यता आहे. यामध्ये आयर्न बॅटरी, डिजीटल इंस्ट्रेमेंट कंसोल, क्लाउड कनेक्टीव्हीटी, अॅलोय व्हील्स, टेलिस्कोपिक सस्पेन्शन हे आणि यासारखे एकसेएक फीचर्स आहेत.

भाविश अग्रवाल यांनी ट्विट केलेल्या या स्कूटरच्या या व्हीडिओमध्ये स्कूटरला मोठी अंडरसीट स्टोवेज, सर्वोत्तम एक्सलेरेशन सेगमेंट लीडिंग रेंजमध्ये दाखवण्यात आलंय. दरम्यान बाईकच्या फीचर्सबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीले नाहीये. या ओला इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती ही तामिळनाडूमध्ये करण्यात येतेय. या प्लांटमध्ये दरवर्षी 10 लाख बाईक्सची निर्मिती होणार आहे.