तुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारात आहात का? तर 'या' सौर कारबद्दल जाणून घ्या

इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला असताना आता सौर ऊर्जेवर चालण्याऱ्या गाडीची चर्चा रंगू लागली आहे.

Updated: Jun 14, 2022, 07:23 PM IST
तुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारात आहात का? तर 'या' सौर कारबद्दल जाणून घ्या title=

मुंबई: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे कारप्रेमींनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळवला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला असताना आता सौर ऊर्जेवर चालण्याऱ्या गाडीची चर्चा रंगू लागली आहे. डच कंपनी लाईटइयर्स लवकरच सौर उर्जेवर चालणारी गाडी बाजारात आणणार आहे. जगातील पहिलेवहिले उत्पादन बाजारात उतरविण्याची तयारी लाईटइयर्स कंपनीने केली आहे. ही कार यशस्वी ठरल्यास ऑटो विश्वात एक मोठी क्रांती ठरणार आहे.

या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांना सौर कारची डिलिव्हरी सुरू करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. नेदरलँड्समध्ये 2016 मध्ये स्थापन झालेल्या लाईटइयर्स कंपनीने 949 मॉडेल बनवणार आहे. या कारच्या हुड आणि छतावरील सौर पॅनेल असणार आहेत. सौर ऊर्जेतून दररोज 70 किलोमीटर (43 मैल) ड्रायव्हिंग रेंजमध्ये जोडेल. कंपनीने या कारमध्ये 1.05 kWh चा सोलर चार्जर दिला आहे, जो दररोज एक तास सोलर चार्जिंगवर 10 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. दुसरीकडे, ही कार पूर्ण दिवस चार्ज करून 70 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. कंपनीने या कारमध्ये चार मोटर्स दिल्या आहेत, ज्या 174 hp पॉवर आणि 1720 Nm टॉक जनरेट करण्यास सक्षम आहेत. ही कार फक्त 10 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते असा दावाही कंपनीने केला आहे.

द लाईटइयर 0 या कारसोबत 5 चौरस मीटरचे सौर पॅनल्स आहेत. दिवसाला 70 किमी पर्यंत कार त्यावर चालू शकेल. जेथे सूर्यप्रकाश चांगलं पडतं तिथे तर ही कार चांगलीच चालेल. कंपनीचे म्हणणे आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार फक्त बॅटरीवर 625 किमी धावू शकते. लाइटइयर झिरो महामार्गावर 110 किमी प्रतितास इतका वेग देण्यास सक्षम आहे. जर कंपनीचा दावा खरा असेल तर ही कार सर्वात ऊर्जा कार्यक्षम कार आहे. कंपनी यावर्षी कारचे उत्पादन सुरू करणार आहे आणि नोव्हेंबर 2022 पासून डिलिव्हरी सुरू होईल.

कंपनीचे म्हणणे आहे की, ज्या देशांमध्ये सूर्यप्रकाश चांगला आहे अशा देशात कार सात महिन्यांपर्यंत चालवता येईल. अशा कारसाठी भारत देश योग्य आहे. यासोबतच ही कार नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये एका चार्जवर दोन महिने चालू शकते, जिथे कमी सूर्यप्रकाश आहे.