साईट हँग झाली तरी, बारावीचा निकाल असा, शॉटकट पाहा

बारावीच्या विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहण्याची सोय खुली करण्यात आली आहे

Updated: May 30, 2018, 01:47 PM IST
साईट हँग झाली तरी, बारावीचा निकाल असा, शॉटकट पाहा title=

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहण्याची सोय खुली करण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना केवळ एक मेसेज पाठवायचा आहे. मोबाईच्या टेक्स्ट मेसेजमध्ये जा. तेथे   MHHSC<space>SEAT NO (सीट नंबर) हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षांचा निकाल 30 मे रोजी लागणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. तंत्रज्ञान म्हटलं की त्यामध्ये बिघाड होणं हे आलेच ! अनेकदा एकाचवेळी अनेकांनी वेबसाईट उघडल्याने निकाल पाहणं अशक्य होते. जर निकाल पाहताना साईट क्रॅश झाल्यास किंवा इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसल्यास तुमच्या मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय उद्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.