येतेय मारुतीची नवीन कार, किंमतआणि फीचर्स एकदा पाहाच...

'मारुती विटारा' ह्युंदाई क्रेटा आणि सेल्टॉसला तगडा मुकाबला देऊ शकते.

Updated: Jul 20, 2022, 03:44 PM IST
येतेय मारुतीची नवीन कार, किंमतआणि फीचर्स एकदा पाहाच... title=

मुंबई : maruti new car launch,मारुतीने गेल्याच महिन्यात ब्रीझा लाँच केली होती आणि आता मारुती नवीन SUV सेगमेंट कार 'ग्रँड विटारा' भारतीय बाजारपेठेत  लाँच करणार आहे.'मारुती विटारा' ही  ह्युंदाई क्रेटा आणि सेल्टॉसला तगडा मुकाबला देऊ शकते असं म्हटलं जातय. 

काय आहेत वैशिष्ट्य

टोयोटाने गेल्या महिन्यात लाँच केलेली अर्बन क्रूझर हायरायडर आणि ग्रँड विटारा या दोन्ही कार एकाच प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही एसयूव्ही माईल्ड हायब्रिड १.५ लीटर पेट्रोल इंजिनसह येतात. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 102bhp पॉवर जनरेट करू शकतं. ही मारुतीची सर्वात मोठी एसयूव्ही असेल्या कारमध्ये लाईट हायब्रीड आणि मजबूत हायब्रिड इंजिन आहे ,यात 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि पॅनोरामिक सनरूफ आहे,

याआधी सनरूफ फीचर मारुतीच्या ब्रीझाला देखिल देण्यात आलेत. मारुतीने या कारसंदर्भात दाखवण्यात आलेल्या टीझर्समध्ये या एसयूव्हीचे  हायटेक फीचर्स दाखवण्यात आले आहेत. कार ऑल व्हील ड्राईव्हसह सादर केली जाईल. ड्राईव्हट्रेनचा  पर्याय केवळ ग्रँड विटाराच्या टॉप व्हेरिएंटमध्येच असणार आहे. . इंटीरियरमध्ये ब्लॅक थीम पाहायला मिळेल. कारचं बम्पर थोडं उंच आहे. फ्रंट बम्परच्या दोन्ही बाजूंना फॉग लाईट देण्यात आले 

अशी करा ही कार प्री-बुक

 केवळ ११ हजार रुपये देऊन ही कार तुम्ही प्री-बुक करू शकता.११ जुलै पासून या गाडीचे बुकिंग सुरु करण्यात आलेय.
'मारुती विटारा'चीसुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये असणार आहे.सुझुकी आणि टोयोटो या दोन कंपन्या मिळून मारुती विटारा कार बनवणार आहेत तर कर्नाटकात या कारची निर्मिती सुरु असल्याची माहिती आहे.