Maruti Suzuki Dzire Sunroof : आता फक्त 6.79 लाखात सनरुफ असलेल्या कारमधुन फिरण्याची मजा घेता येणार आहे. बहुचर्चित Maruti Suzuki Dzire Sunroof कार अखेर लाँच झाली. बेस्ट प्राईजमध्ये luxurious फिचर्स हे कारचे वैशिष्ट्य आहे. मध्यवर्गींयांना विचारात घेऊन ही कार लाँच करण्यात आली आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये Maruti Suzuki Dzire 2024 या कारला रेकॉर्डब्रेक रेटिंग मिळाले आहेत.
मारुती सुझुकीची Maruti Suzuki Dzire कार ही सर्वात लोकप्रिय सेदान कार आहे. Maruti Suzuki Dzire 2024 हे या कारचे नवे अपडेटेड व्हर्जन आहे. सनरुफ, 360 डिग्री कॅमेऱ्यासारखे लेटेस्ट फिचर्स या कारमध्ये देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या कारमध्ये जबरदस्त मायलेज मिळणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर आणि अधिकृत डीलरशिपद्वारे फक्त 11,000 रुपयात या कारचे बुकिंग करता येणार आहे.
नवी Maruti Suzuki Dzire टाटा टिगोर, ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ या कारना टक्कर देणार आहे. लाँचिंगपूर्वीच या कारचे फोटो व्हायरल होते. व्हायरल फोटोमध्ये Maruti Suzuki Dzire मध्ये सनरुफ मिळणार असल्याचे दिसत होते. यामुळे ही कार कधी लाँच होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती.
या अपडेटेड व्हर्जनमध्ये मोठ्या ग्रिल, फुल LED हेडलॅम्प, एलईडी फॉग लाइट्स, नवीन फ्रंट आणि रियर बंपर आणि नवीन अलॉय व्हील देण्यात आले आहेत. 5 360-डिग्री कॅमेरा, ट्राय-एरो एलईडी टेललाइट्स, बूटलिडवर इंटिग्रेटेड स्पॉयलर तसेच इंटेरियरमध्ये अपहोल्स्ट्री आणि डार्क कलरची डॅशबोर्ड अशी थीम देण्यात आली आहे. सात आकर्षक रंगात ही कार मिळणार आहे.
नवीन स्विफ्टचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 24.8 किमी प्रति लीटर मायलेज देईल. पेट्रोल एएमटी व्हेरिएंट प्रति लिटर 25.75 किमी मायलेज मिळेल असा दावाकंपनीने केला आहे. Dezire चे CNG व्हेरिएंट देखील लाँच करण्यात आले आहे. यात कंपनी फिटेड CNG कीट देण्यात आला आहे. CNG वेरिएंट 33.73 किमी इतका मायलेज देणार आहे. जाणार आहे. ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki Dzire कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. 5 स्टार रेटिंग मिळवणारी सुझुकीची ही पहिलीच कार आहे. यापूर्वी मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट SUV मारुती ब्रेझ या कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4-स्टार रेटिंग मिळाले होते. यात सेफ्टीसाठी 6 एअर बॅग देखील देण्यात आल्या आहेत.