Maruti Suzukiच्या या कारवर जबरदस्त डिस्काऊंट

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनदरम्यान, मारुती सुझुकीकडून आपल्या कारवर जबरदस्त डिस्काऊंट देण्यात येत आहे. 

Updated: Sep 24, 2020, 01:50 PM IST
Maruti Suzukiच्या या कारवर जबरदस्त डिस्काऊंट title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : जर येणाऱ्या काही दिवसांत गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीच्या कारसाठी विचार करण्यास हरकत नाही. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनदरम्यान, मारुती सुझुकीकडून आपल्या कारवर जबरदस्त डिस्काऊंट देण्यात येत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही ऑफर सुरु राहणार आहे. मारुती सुझुकी आणि त्यांच्या डिलरशीपकडून देण्यात आलेला डिस्काऊंट विविध राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगळा असू शकतो.

Tour H2 (P & CNG) मॉडेलवर 60,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. 

मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी कार New Dzire (MT) (AMT) वर 40000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. यात 10000 रुपयांपर्यंत कंज्यूमर ऑफर, 25000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर सामिल आहे. AMT वेरिएंट जवळपास 24 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देतं. या कारची दिल्ली एक्सशोरुम किंमत 5,89,000 रुपयांपासून सुरु आहे. ओल्ड डिझायर एडिशनमध्ये 30000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

ऑल्टो 800 (पेट्रोल आणि सीएनजी)

मारुती ऑल्टो 800 वर 38000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. यात 18000 रुपयांपर्यंत कंज्यूमर ऑफर, 15000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर सामिल आहे. या कारची दिल्ली एक्सशोरुम किंमत 2,94,800 रुपयांपासून सुरु आहे.

New WagonR पेट्रोल आणि सीएनजी 

New WagonR पेट्रोल आणि सीएनजीवर या महिन्यात 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. WagonR पेट्रोलवर 10000 रुपये कंज्यूमर ऑफर, 20000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर आहे. सीएनजीमध्ये केवळ कंज्यूमर ऑफर 15000 रुपये आहे.

Celerio 

मारुतीच्या हॅचबॅक सेलेरियोवर या महिन्यात 50000 रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Celerio (पेट्रोल आणि सीएनजी) (MT) (AMT) वर सध्या कोणताही दुसरा डिस्काऊंट नाही.