मारुती स्विफ्ट कारमध्ये देणार 'हे' खास फिचर, तुमच्या कारमध्ये आहे का ही सुविधा?

कार बनवणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या मारुती सुजुकी कंपनीने आपली इमेज आणखीन मजबूत करण्यासाठी तयारी केली आहे.

Sunil Desale Updated: Mar 19, 2018, 10:30 PM IST
मारुती स्विफ्ट कारमध्ये देणार 'हे' खास फिचर, तुमच्या कारमध्ये आहे का ही सुविधा? title=
Image: PTI

मुंबई : कार बनवणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या मारुती सुजुकी कंपनीने आपली इमेज आणखीन मजबूत करण्यासाठी तयारी केली आहे.

ग्राहकांची मोठी मागणी

मारुती सुजुकीच्या स्विफ्ट कारला ग्राहकांची मोठी मागणी आहे आणि हेच लक्षात घेवून कंपनीने आता या गाडीला अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने सुरु केलं हे काम

मारुती सुजुकीने यावर्षी स्विफ्ट कारमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे कार आणखिन दमदार परफॉर्मन्स देईल.

स्विफ्ट हॅचबॅकमध्ये लॉन्च केलं जाण्याची शक्यता

हे फिचर कंपनीच्या नव्या स्विफ्ट हॅचबॅकमध्ये लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. ही गाडी कंपनीने ५ स्पीड गिअरबॉक्ससोबत ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये लॉन्च केलं होतं.

सध्या बाजारात असलेल्या मारुती सुजुकीच्या अल्टो पासून सिजायपर्यंत सर्वच गाड्यांना ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आल्या आहेत.

कंपनीने दिला दुजोरा

कंपनीने नुकतचं ६ स्पीड गिअरबॉक्स देण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याचं कोडनेम MF ३० असं आहे आणि यंदाच्या वर्षी बनणाऱ्या सर्व कारमध्ये ही सुविधा असणार आहे. हा गिअरबॉक्स कारच्या ओवरऑल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्सला खूपच चांगला बनवणार आहे.

मारुती पहिल्या वर्षी ५०,००० युनिट्समध्ये हे फिचर देणार आहे आणि २०२० पर्यंत याची मागणी वाढून ४ लाख युनिट्स होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीने काही दिवसांपूर्वी S-Cross मध्ये ६ स्पीड गिअरबॉक्सचा वापर केला होता. मात्र, याला जास्त यश आलं नाही. मारुती सुजुकीने S-Cross च्या आधिच्या जनरेशनमध्ये १.६ लीटर इंजिन आणि ६ स्पीड गिअरबॉक्स दिलं होतं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x