Maruti च्या 10 नव्या कार लवकरच तुमच्या भेटीला; Savings, डाऊन पेमेंट तपासून पाहा

Maruti Cars : आताच पाहा मारूतीच्या कोणकोणत्या कार ठरणार गेम चेंजर... तुम्ही कोणती खरेदी करणार आहात? बँक खात्यात असणारी रक्कम आणि त्यानंतर तुम्हाला भरावी लागणारी रक्कम सर्वकाही पाहा... 

सायली पाटील | Updated: Aug 8, 2023, 11:18 AM IST
Maruti च्या 10 नव्या कार लवकरच तुमच्या भेटीला; Savings, डाऊन पेमेंट तपासून पाहा  title=
Maruti to launch 10 new Cars including 6 electric vehicals

Maruti Cars : कारप्रेमींना कायमच कोणत्या ब्रँडचं कोणतं नवं मॉडेल बाजारात येतंय याची उत्सुकता लागून राहिलेली असते. हल्ली तर अनेक युट्युबर, इन्फ्लूएन्सर या मंडळींकडूनही याबाबतची माहिती दिली जात असल्यामुळं तुम्हीआम्ही Auto क्षेत्रातील घडामोडींमुळंही बरेच अपडेट असतो. मुळात भारतीयांचा या क्षेत्राकडे असणारा कलही वाखाणण्याजोगा आहे. तुम्हीही याच कारप्रेमींपैकी एक आहात का? तर येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एकाहून एक सरस कार पाहण्याची संधी मिळणार आहे. 

कार खरेदीच्या प्रतीक्षेत असाल तरीही तुमच्यासाठी ही माहिती फायद्याची. कारण, मारुती सुझुकीनं आता येत्या काळासाठी स्पर्धेत असणाऱ्या इतर ब्रँडना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. डो-जापानी ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकी सध्या इलेक्ट्रिक मोबिलिटीसह सस्टेनेबल सॉल्यूशन वर आणखी भर देत असून, Maruti Suzuki 3.0 ही योजना नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कंपनीकडून 2031 या आर्थिक वर्षापर्यंत 1.5 मिलियनहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांनी निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये 10 नव्या मॉडेलचाही समावेश असेल. 

सध्याच्या घडीला कंपनीकडून भारतात 19 मॉडेल्सची विक्री केली जाते. 2030 आणि 31 पर्यंत हा आकडा 29 मॉडेल्सपर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Personal Loan घेण्याच्या विचारात आहात? 'या' बँका देतायत फायदेशीर ऑफर 

मारुती सुझुकीच्या 3.0 योजनेबद्दल थोडं... 

मारुती येत्या काळात नेमके कोणते मॉडेल बाजारात आणते याबाबत अद्यापही स्पष्टोक्ती झालेली नाही. पण हे मॉडेल येणार हे मात्र नक्की त्यामुळं आतापासूनच तुम्ही Saving, Loan साठीची तपासणी करून घ्या. आता राहिला मुद्दा मारुती सुझुकीच्या नव्या मॉडेलचा, तर येत्या काळात कंपनीचं उत्पादन वाढवण्यासाठी म्हणून या योजनांची आखणी करत व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. परिणामी 2031 पर्यंत एकूण 4 मिलियम वाहनांची संख्या वाढेल. 

मारूतीच्या या वाहनांपैकी 15 टक्के वाहनं म्हणजेच जवळपास 6000000 युनिट्स ईवी आणि 1 मिलियन युनिट हायब्रिड असणार आहेत. परिणामी 2031 पर्यंत सुझुकीच्या एकूण युनिटची संख्या 750000 पर्यंत पोहोचणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी या माहितीला दुजोरा दिला. सध्याच्या घडीला गुजरात फॅसिलिटीमध्ये ईवी डेवलपमेंट कार्य वेगानं सुरु असल्याचं म्हणत 2024 - 25 पर्यंत कंपनी पहिली ईवी लाँच करण्यासाठी तयार असल्याचंही ते म्हणाले.