Online Shopping करताना Cash On Delivery करत असाल तर, थांबा.., नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Flipkart Sale: कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) म्हणजे जेव्हा वस्तू ग्राहकाला दिली जाते त्यानंतरच ग्राहक त्या वस्तूचे पैसे देतात. 

Updated: Oct 29, 2022, 03:45 PM IST
Online Shopping करताना Cash On Delivery करत असाल तर, थांबा.., नाहीतर येईल पश्चातापाची वेळ   title=

Online Order : ई कॉमर्स वेबसाईट्सपैकी फ्लिपकार्टला (Flipkart) ग्राहकांची मोठी पसंती असते. आपण पाहिले तर  यूपीआय (UPI) आधारित पेमेंट्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. Flipcartवर डिलिव्हरी घेण्यासाठी कॅश ऑन  डिलिव्हरीचा पर्यायही देण्यात येतो. मात्र आता फ्लिपकार्ट (Flipkart) कॅश ऑन डिलिव्हरीवर अतिरिक्त शुल्क आकारत आहे.

कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय

कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) म्हणजे ग्राहकाला वस्तू डिलिव्हरी केल्यानंतरच ग्राहक वस्तूचे पैसे देतो. मात्र, आता फ्लिपकार्टने (Flipkart) कॅश ऑन डिलिव्हरीवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, ज्याद्वारे ग्राहकाला त्यावर अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

कॅश ऑन डिलिव्हरीवर हे शुल्क असेल

फ्लिपकार्टने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की, डिलिव्हरी चार्ज हा छुपा चार्ज नाही आणि विक्रेत्याच्या शिपिंग (shopping policy) पॉलिसीनुसार अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यापूर्वी फ्लिपकार्ट कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरसाठी शुल्क आकारत नव्हते. आता तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पॉलिसी अंतर्गत रु. 150 किंवा रु. 15,000 चे उत्पादन ऑर्डर करत असलात तर डिलिव्हरी शुल्काव्यतिरिक्त तुम्हाला प्रति ऑर्डर 5 रुपये द्यावे लागतील.

वाचा: Hair Loss : केसगळतीची 'ही' आहेत मुख्य कारणे, जाणून घ्या ही समस्या कशी दूर करावी

शुल्क टाळा

फ्लिपकार्टवर जेव्हा ग्राहक कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडतो तेव्हा हा संदेश देखील दिसतो, Due to handling costs, a nominal Rs 5 will be charged for orders placed using this option (COD). Avoid this fee by paying online now" याचा अर्थ असा की, कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरसाठी 5 रुपये आकारले जातील. हे शुल्क ऑनलाइन भरून टाळता येऊ शकते.